ईदगाह मैदान,मशीदीत होणार नमाज

By Admin | Updated: July 29, 2014 01:04 IST2014-07-28T23:26:39+5:302014-07-29T01:04:25+5:30

अहमदनगर : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसातही बाजार हाऊसफुल्ल होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठीचा उत्साह दुणावला.

Idajah Maidan, mosque to be performed prayers | ईदगाह मैदान,मशीदीत होणार नमाज

ईदगाह मैदान,मशीदीत होणार नमाज

अहमदनगर : रमजान ईदच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. रिमझिम पावसातही बाजार हाऊसफुल्ल होता. दुपारनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरेदीसाठीचा उत्साह दुणावला. मंगळवारी सकाळी ९.३० वाजता यतीमखाना मशीदीचे प्रमुख मौलवी मुख्य नमाज अदा करणार आहेत. सामूहिक नमाज अदा करण्यासाठी कोठला येथील ईदगाह मैदान सज्ज झाले आहे. शहरातील सर्वात जुन्या मशीदींमध्येही नमाज अदा केला जाणार आहे. ईदनिमित्त मशीदी, घरांवर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
चंद्र दर्शनाने सुरू झालेली रोजाची चंद्र दर्शनानेच सांगता होत आहे. अरब राष्ट्रात दोन दिवसांपूर्वीच ईद साजरी झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे चंद्र दर्शन झाले नसले तरी ईद मंगळवारीच साजरी होईल. ईदच्या दिवशी उपवास केला जात नाही. सुका मेवा, शिर-खुरमा खाल्ल्यानंतरच मुस्लीम बांधव नमाज अदा करण्यासाठी जाणार आहेत. मुरुम, लाल माती टाकून ईदगाह मैदान सज्ज करण्यात आले आहे. मैदानाभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस प्रशासनातर्फे गुलाब देऊन मुस्लीम बांधवांचे स्वागत केले जाणार आहे.
आत्म्याची शुद्धी
नमाज पठणाने आत्म्याची शुद्धी केली जाते. रमजानच्या महिन्यामध्ये नमाज पठण केल्याने शंभर पटीने पुण्य वाढते, अशी धारणा आहे. कुरआन शरीफ या धर्मग्रंथाचे वाचनही याच महिन्यात करण्यात आले. यापठणामुळे अल्लाहची दुवा मिळते, असे युवा अभ्यासक शेख नबेद याने सांगितले. नमाज अदा करण्यासाठी जाताना प्रत्येकाच्या मनात ‘अल्ला हो अकबर’ अशी प्रार्थना केली जाते. हिजरी सणाच्या चौदाव्या शतकापासून रमजान साजरा केला जातो, असेही तो म्हणाला. मुलगा तेरा वर्षाचा झाला की नमाज पठण करणे हे त्याचे कर्तव्य ठरते.
जाण्याचा एक मार्ग, येण्याचा दुसरा
मुस्लीम बांधव सामूहिक नमाज अदा करण्यासाठी एका रस्त्याने ईदगाह मैदानावर जाणार असून दुसऱ्या रस्त्याने घरी येणार आहेत. त्यामुळे ईदगाह मैदानाकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर मनपाने स्वच्छता केली आहे. तसेच पोलीसही तैनात केले आहेत. घरातून निघताना ते शिर-खुरमा खाऊनच नमाज अदा करतील. ईदच्या दिवशी उपवास केला जात नाही. प्रत्येकाच्या घरी शिर-खुरमा केला जातो. तो खाण्यासाठी मित्रमंडळी,नातेवाईकांना निमंत्रण दिले जाते. यामधून जातीय सलोखा वाढीस लागतो.
शहरातील जुन्या मशिदी
कापडबाजारातील बादशाह मशीद (मर्कज), पारशाखुंट, बाबा बंगाली मशीद, मिलिटरी मशीद, माळीवाडा मशीद, सर्जेपुरा येथील तांबोळी का कब्रस्तानजवळील मशीद (मर्कज), तख्ती दरवाजा (आशा टॉकिज) आदी मशीद सर्वात जुन्या आहेत. येथेही नमाज अदा केला जाणार आहे. शहरातील प्रत्येक गल्लीमध्ये एक मशीद हे नगरचे खास वैशिष्ट्य आहे.

Web Title: Idajah Maidan, mosque to be performed prayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.