शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
2
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
3
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
4
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
5
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
6
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
8
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
9
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
10
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
11
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
12
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
13
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
14
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
15
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
16
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
17
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
18
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
19
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
20
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी कारखान्यासाठी थांबलो; पुढच्या वेळी पुन्हा मीच-राहुल जगताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 14:49 IST

कुकडी साखर कारखान्यात अधिक लक्ष देण्यासाठी श्रीगोंद्यातील कुरुक्षेत्रात स्वत: उमेदवार नाही. पण निवडणुकीचे कुरुक्षेत्र सोडलेले नाही. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन लढाई जिंकणार आहे. या निवडणुकीत चार पावले मागे आलो तरी पुढच्या निवडणुकीची आजच तयारी सुरू झाली आहे, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला. 

श्रीगोंदा : कुकडी साखर कारखान्यात अधिक लक्ष देण्यासाठी श्रीगोंद्यातील कुरुक्षेत्रात स्वत: उमेदवार नाही. पण निवडणुकीचे कुरुक्षेत्र सोडलेले नाही. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला साथ देऊन लढाई जिंकणार आहे. या निवडणुकीत चार पावले मागे आलो तरी पुढच्या निवडणुकीची आजच तयारी सुरू झाली आहे, असा इशारा आमदार राहुल जगताप यांनी दिला.  पिंपळगाव पिसा येथे शनिवारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. याप्रसंगी जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस होते. यावेळी राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम शेलार, बाळासाहेब उगले, अरुण पाचपुते, दीपक भोसले, विश्वास थोरात, एकनाथ बारगुजे, अ‍ॅड. निवृत्ती वाखारे, अतुल लोखंडे, स्मितल वाबळे उपस्थित होते. जगताप पुढे म्हणाले, पाच वर्षे आपच सन्मानाने आमदारकी संभाळली. सामान्य माणसांची प्रतिष्ठा वाढविण्याचे काम केले. पण सध्या काही जण ईडी चौकशीला घाबरले, असा अपप्रचार करीत आहेत. पण त्यांनी कोट्यवधीची माया जमविली. शेतकºयांची बिले थकविली. ते घाबरत नाहीत. मी कशासाठी घाबरू, असा सवाल त्यांनी केला. स्व.कुंडलिक तात्यांनी मोठ्या कष्टाने कुकडी कारखाना उभा केला. पण सध्या कारखानदारीत खूपच अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत कुकडी कारखान्याच्या माध्यमातून शेतकºयांना न्याय देणे एवढेच काम करणार आहे. यातून शेतक-यांच्या प्रंपचाला उभारी देणार आहे. पण, काही जण म्हणणार आहेत जगताप संपले आहेत. पण या लढाईत चार पावले मागे घेऊन पुढच्या लढाईची तयारी सुरू झाली आहे. कार्यकर्त्यांनी चिंता करू नये. राजकारणात आपल्याला यापेक्षा चांगले दिवस येतील, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर