मी गद्दारांच्या यादीत नाही, भगव्याच्या धुंंदीत; राणे पिता-पुत्रांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 15:05 IST2020-08-11T15:04:12+5:302020-08-11T15:05:46+5:30
राणे नेहमी माझ्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील किती वेळा शुध्दीत असतात? अरे मी नेहमी भगव्याच्या धुंदीत असतो. मी तुमच्यासारख्या गद्दाराच्या यादीत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली.

मी गद्दारांच्या यादीत नाही, भगव्याच्या धुंंदीत; राणे पिता-पुत्रांवर मंत्री गुलाबराव पाटील यांची टीका
अहमदनगर : राणे नेहमी माझ्यावर टीका करतात. गुलाबराव पाटील किती वेळा शुध्दीत असतात? अरे मी नेहमी भगव्याच्या धुंदीत असतो. मी तुमच्यासारख्या गद्दाराच्या यादीत नाही, अशी टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी राणे पिता-पुत्रांवर केली.
तुम्ही भगव्याला सोडून पळाले. काँग्रेसमध्ये गेले. नंतर भाजपमध्ये आले. मी निष्ठावंत शिवसैनिक आहे. त्यामुळे आपण आधी आपली औकात निष्ठा कुठे आहे ती ओळखावी. नंतरच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांवर टीका करावी, असेही पाटील म्हणाले.
स्व. अनिल राठोड यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी ते मंगळवारी नगरला आले होते. यावेळी ते म्हणाले, गेल्या अनेक वषार्पासून मी व अनिल राठोड एकत्रपणे आमदार म्हणून काम करत होतो. दोघे एकाच वेळी उपनेते झालो, राठोड यांच्या रुपाने एक सच्चा मित्राला गमावले असल्याची खंत पाटील यांनी व्यक्त केली.राठोड यांच्या निधनाने नगरच्या शिवसेनेचेच नाही तर शिवसेना पक्षाचे सुद्धा नुकसान झाले आहे, असेही ते म्हणाले.