डोक्यात कुदळ घालून पतीचा खून : पत्नीस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:50 IST2018-08-14T16:50:04+5:302018-08-14T16:50:44+5:30

दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली.

The husband's blood on his head, his wife's arrest | डोक्यात कुदळ घालून पतीचा खून : पत्नीस अटक

डोक्यात कुदळ घालून पतीचा खून : पत्नीस अटक

कोपरगाव : दारू पिऊन येणाऱ्या पतीच्या रोजच्या भांडणास कंटाळलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यात विटा व कुदळीचे घाव घालून खून केल्याची घटना १३ आॅगस्ट रोजी रात्री ९ च्या सुमारास शहरातील मोहिनीराज नगरात घडली.
घटनेबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रघुनाथ लहानू गायकवाड (वय ४८) व त्याची पत्नी शांताबाई (वय ४०) शहरातील मोहिनीराज परिसरात राहतात. सोमवारी रात्री रघुनाथ दारू पिऊन घरी आला. त्याचे पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. नेहमीच्या या त्रासाला कंटाळलेल्या शांताबाईने रघुनाथला मारण्यास सुरवात केली. दोघांमध्ये प्रचंड हाणामारी झाली. संतापलेल्या शांताबाईने प्रथम विटाने व नंतर कुदळीने डोक्यात मानेवर वार केले. यात जखमी झालेल्या रघुनाथचा जागीच मृत्यू झाला. अशा आशयाची फिर्याद मयत रघुनाथचा भाऊ बाळासाहेब गायकवाड याने कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यानंतर आरोपी शांताबाईस अटक केली आहे .घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव करीत आहे.

 

Web Title: The husband's blood on his head, his wife's arrest