पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 14:47 IST2020-05-27T14:45:34+5:302020-05-27T14:47:34+5:30
कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपविले.

पत्नीची हत्या करून पतीने रेल्वेखाली केली आत्महत्या
श्रीरामपूर : दत्तनगर येथे कौटुंबिक वादातून पतीने झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात दगडी पाटा घालून हत्या केली. त्यानंतर पतीनेही रेल्वेखाली आत्महत्या करून जीवन संपविले.
मयतांची नावे राजन अरुण गायकवाड व शिल्पा राजन गायकवाड अशी आहेत. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि.२६ मे) दुपारी ही घटना घडली. घरातील लहान मुलीने हा प्रकार पाहिला. तिने आजीला घटनेची माहिती दिली. सरपंच सुनील शिरसाठ यांनी महिलेला नातेवाईकांसह दोघांना श्रीरामपूर शहरात साखर कामगार रुग्णालयात हलविले. तेथे प्रकृती खालावल्याने तिला लोणी येथे प्रवरा रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान सायंकाळी उशिरा महिलेचा मृत्यू झाला.
घटनेनंतर राजन हा पसार झाला होता. त्याचा पोलीस शोध घेत होते. मात्र संजयनर परिसरातील रेल्वे फाटकाजवळ त्याने रेल्वेखाली आत्महत्या केली.