तार कंपाउंड करण्याच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:15 IST2021-07-22T04:15:03+5:302021-07-22T04:15:03+5:30
सोमवारी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान रंजना शिवदास मोरे (रा. देवळाली प्रवरा) या त्यांच्या शेतात होत्या. यावेळी आरोपी शेतातील सामायिक ...

तार कंपाउंड करण्याच्या कारणावरून पती-पत्नीला मारहाण
सोमवारी सकाळी साडेआठ वाजे दरम्यान रंजना शिवदास मोरे (रा. देवळाली प्रवरा) या त्यांच्या शेतात होत्या. यावेळी आरोपी शेतातील सामायिक बांधावर लोखंडी अँगलने तार कंपाउंड करीत होते. फिर्यादी रंजना मोरे म्हणाल्या, शेताची मोजणी झाल्यानंतर तुम्ही तार कंपाउंड करा. याचा आरोपींना राग आला. त्यांनी मोरे व त्यांचे पती आणि मुलास शिवीगाळ दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी, लोखंडी अँगलने तसेच लाकडी काठीने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.
रंजना शिवदास मोरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आरोपी भीमराज भागवत शेटे, विनोद भीमराज शेटे, उषा भीमराज शेटे, सोनाली विनोद शेटे (रा. देवळाली प्रवरा), राहुरी शहरातील एक व्यक्ती पाच जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक जानकीराम खेमनर हे करीत आहेत.