शहरं
Join us  
Trending Stories
1
९५ टक्के लोकांचा पहिली ते चौथी हिंदी भाषा लादण्याला विरोध; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेंद्र जाधव म्हणाले...
2
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
3
मोठी डेडलाईन! पॅन कार्डशी आधार लिंक करण्याची अंतिम तारीख जाहीर; घरबसल्याही करता होईल काम
4
Groww IPO: 'ग्रो'चा आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुला; काय आहे प्राईज बँड, किती करावी लागणार गुंतवणूक, जाणून घ्या
5
वर्गात अवघे १२ विद्यार्थी अन् पटावर ५०! शिक्षण अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांचे नाव विचारताच समोर आलं धक्कादायक सत्य
6
हृदयद्रावक! "माझ्या मुली गेल्या, आता मी काय करू?"; ३ बहिणींचा मृत्यू, आई-वडिलांचा टाहो
7
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
8
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
9
Video: लायब्ररीतून परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर झाडल्या गोळ्या, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
11
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
12
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
13
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
14
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
15
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
16
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
17
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
18
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
19
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
20
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!

सव्वाशे शिक्षकांच्या बदल्यांवर हरकती : महिनाभराच्या उशिराने सुनावणीला मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2019 13:36 IST

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. 

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील सव्वाशे शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकती नोंदविल्या असून, या हरकतींवर सोमवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात सुनावणी होणार आहे. बदली प्रक्रियेवर आक्षेप असणाऱ्यांच्या तक्रारींवर एका महिन्यात सुनावणी घेऊन निपटारा करावा, असा आदेश असताना दोन महिन्यानंतर या सुनावणीला मुहूर्त सापडला आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. गैरसोेयीच्या बदल्या झाल्यामुळे अनेक शिक्षक नाराज झाले होते. तर काही शिक्षकांनी आॅनलाईनवर भरलेल्या आॅप्शनपैकी एकही शाळा मिळाली नव्हती. एका शाळेवर दोघांच्या बदल्या झाल्याचेही प्रकार घडले होते़ शाळांचा आॅनलाईन आॅप्शन भरताना जेथे जागा आहेत, अशाच शाळा दिसणे आवश्यक होते़ मात्र, तेथे सर्वच शाळांची यादी येत होती़ त्यामुळे ज्या शाळेवर रिक्त जागाच नाही, अशा शाळांचे आॅप्शनही भरण्यातआले़ त्यामुळे रिक्त शाळा न मिळाल्यामुळे शिक्षकांना समायोजनामध्ये दूरच्या शाळेवर जावे लागले़ यातून काही शिक्षकांच्या गैरसोयी झाल्या़ त्यामुळे शिक्षण विभागाने केलेल्या बदलीप्रक्रियेवर अनेक शिक्षकांनी हरकती नोंदविल्या आहेत़ बदली झाल्यानंतर सात दिवसात हरकती घेऊन त्यावर एका महिन्यात सुनावणी घेण्यात यावी, असा आदेश सरकारने बजावला होता़ मात्र, बदली प्रक्रिया होऊन २ महिने झाले तरी शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यात आली नव्हती़ आता २१ आॅगस्ट रोजी प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी तक्रारदार शिक्षकांच्या अर्जावर सोमवारी (दि़२६) सुनावणी घेण्यात येणार असल्याचे कळविले आहे़ सोमवारी सकाळी ११ वाजता जिल्हा परिषदेच्या सभागृहात तक्रारदार शिक्षकांनी विहित कागदपत्रांसह सुनावणीस उपस्थित राहण्याच्या सूचना काठमोरे यांनी केल्या आहेत़पालकमंत्र्यांच्या मतदारसंघातून सर्वाधिक तक्रारीशिक्षकांच्या बदल्यांवरुन सर्वाधिक तक्रारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या मतदारसंघातून करण्यात आल्या आहेत़ कर्जत-जामखेड मतदारसंघातील सर्वाधिक ३१ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़ त्याखालोखाल अकोले तालुक्यातून २८, पारनेरमधून ९, राहात्यातून २ , शेवगावमधून ६, नगर तालुक्यातून ८, कोपरगावमधून १३, पाथर्डीमधून ६, राहुरीतून १, श्रीगोंद्यातून ७, नेवासातून १०, संगमनेरमधून २ अशा एकूण १२३ शिक्षकांनी बदल्यांबाबत तक्रारी केल्या आहेत़श्रीरामपूर ठरला समाधानी शिक्षकांचा तालुकाबदली प्रक्रियेत असमाधानी असलेल्या शिक्षकांची संख्या सर्वाधिक कर्जत, जामखेड, अकोले तालुक्यात आहे़ मात्र, श्रीरामपूर तालुक्यातील एकाही शिक्षकाचे तक्रारदार यादीत नाव नाही़ त्यामुळे श्रीरामपूर तालुक्यातील सर्व शिक्षक बदल्यांबाबत समाधानी आहेत, असे सांगण्यात येते़ तर राहुरी तालुक्यातील केवळ १ व राहाता आणि संगमनेर तालुक्यातील प्रत्येकी २ शिक्षकांनी बदली प्रक्रियेवर हरकत घेतली आहे़नियोजित कामांमुळे शिक्षकांच्या तक्रारींवर सुनावणी घेण्यास उशीर झाला. या सुनावणीसाठी शिक्षकांना बोलावण्यात आले असून, काही शिक्षकांची नावे यादीत नव्हती. अशा शिक्षकांनाही फोनवरुन याबाबतची माहिती दिली आहे. त्यामुळे बदलीबाबत तक्रार असलेल्या शिक्षकांची संख्या १३० पर्यंत जाण्याची शक्यता आहे. - रमाकांत काठमोरे, शिक्षणाधिकारी

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar zpअहमदनगर जिल्हा परिषद