शंभर नंबरी ४७ शाळा
By Admin | Updated: June 3, 2014 00:28 IST2014-06-02T23:40:18+5:302014-06-03T00:28:11+5:30
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
शंभर नंबरी ४७ शाळा
अहमदनगर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यात ४७ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या निकालात ९९ टक्क्यांपेक्षा अधिक निकाल लागलेल्या शाळांची संख्या ४ असून ९० टक्क्यांपेक्षा अधिक निकाल असणार्या शाळांची संख्या १६५ आहे. सोमवारी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने फेबु्रवारी महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या शाळांचा निकाल जाहीर झाला. यंदाच्या निकालात गतवर्षी प्रमाणे मुलांपेक्षा मुलींनी आघाडी घेतलेली आहे. शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये सर्वाधिक शाळा या संगमनेर आणि नगर तालुक्यातील प्रत्येकी ८ आहेत. त्या खालोखाल पारनेर, राहाता आणि श्रीगोंंदा तालुक्यातील प्रत्येकी ५ शाळांचा समावेश असून राहुरी आणि शेवगाव तालुक्यातील प्रत्येकी ३ शाळांचा समावेश आहे. अकोले, कर्जत, नेवासा आणि पाथर्डी या तालुक्यातील प्रत्येकी २ शाळांचा निकाल शंभर टक्के लागलेला असून जामखेड आणि नगर शहरातील सहा शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे. ९९ टक्के निकाल लागलेल्या शाळांमध्ये नगर शहरातील शाळेचा, पाथर्डी येथील दोन शाळांचा आणि श्रीगोंदा येथील शाळेचा समावेश आहे. ९० ते ९८ टक्क्यांपर्यंत जिल्ह्यातील तब्बल १६५ शाळांचा समावेश आहे. ५० टक्क्यांपेक्षा कमी निकाल असणार्या शाळेत कर्जत तालुक्यातील बेनवडी शाळेचा निकाल ३३.३३ टक्के तर राशीनच्या ज्युनिअर कॉलेजचा निकाल ४५ . ४५ टक्के लागलेला आहे. आॅनलाईन पध्दतीने जाहीर झालेल्या निकालाची मुळ प्रत संबंधीत विद्यार्थ्यांना लवकरच त्यांच्या शाळेत अथवा ज्युनिअर कॉलेजमध्ये मिळणार असल्याचे जिल्हा परिषदेच्या माध्यामिक शिक्षण विभागाच्यावतीने सांगण्यात आले.