खासदार दिलीप गांधी यांच्या बंधूचे हॉटेल सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:03 IST2018-07-18T15:02:59+5:302018-07-18T15:03:49+5:30
भाजपाचे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार दिलीप गांधी यांच्या बंधूचे हॉटेल महापालिकेने थकबाकीपोटी सील केले आहे.

खासदार दिलीप गांधी यांच्या बंधूचे हॉटेल सील
अहमदनगर : भाजपाचे अहमदनगर जिल्ह्याचे खासदार दिलीप गांधी यांच्या बंधूचे हॉटेल महापालिकेने थकबाकीपोटी सील केले आहे. कापड बाजारातील अनिल मनसुखलाल गांधी यांचे हॉटेल देवेंद्र महापालिकेच्या पथकाने सील केले.
आज दुपारी माळीवाडा प्रभाग कार्यालयाने ही कारवाई केली. महापालिकेची सहा लाख रुपयांचा कर थकीत आहे. अलीकडे महापालिकेने थकबाकीविरोधात मोहिम सक्रिय केली आहे.