नगर-पुणे शटल सेवेच्या आशा पल्लवित

By Admin | Updated: July 8, 2014 00:28 IST2014-07-07T23:22:06+5:302014-07-08T00:28:37+5:30

अहमदनगर: केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात नगर-पुणे या शटल सेवेला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. या मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून केवळ निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे.

Hope for the city-Pune shuttle service | नगर-पुणे शटल सेवेच्या आशा पल्लवित

नगर-पुणे शटल सेवेच्या आशा पल्लवित

अहमदनगर: केंद्र सरकारच्या रेल्वे अर्थसंकल्पात नगर-पुणे या शटल सेवेला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता आहे. या मार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून केवळ निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा आहे. मंगळवारी सादर होणाऱ्या रेल्वे अर्थसंकल्पात या रेल्वेमार्गासाठी तरतूद झाली तर नगरहुन पुण्याला दीड तासात पोहोचणे शक्य होणार आहे, असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले.
नगर जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नांबाबत गांधी यांनी रेल्वेमंत्री सदानंद गौडा आणि रेल्वेचे महाप्रबंधक सुनील कुमार यांची भेट घेतली होती. या रेल्वे प्रश्नांना रेल्वे अर्थसंकल्पात न्याय मिळेल, अशी शक्यता आहे. दौंड-मनमाड लाईन दुहीरीकरण व सर्व्हे, नगर-बीड-परळी या रेल्वेमार्गासाठी तरतूद, नगर-माळशेज-कल्याण रेल्वे लाईन सर्व्हे करून मंजूर मिळण्यासाठी रेल्वेकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. पुणे-केडगाव-काष्टी-अहमदनगर-काष्टी-पाटस- केडगाव-पुणे ही नवीन कॉड लाईन टाकण्याबाबतही प्रस्ताव सादर करण्यात आलेला आहे. त्यामुळे नगर ते पुणे रेल्वे अवघ्या दीड ते दोन तासात शटल सेवा सुरू करता येणार आहे. नाशिक कुंभमेळ््यासाठी शनिशिंगणापूर येथे रेल बुकिंग काऊंटर सुरू करणे,सोलापूर-नगर-मनमाड-नाशिक दरम्यान विशेष रेल्वे सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. नगर रेल्वेस्टेशनवर प्लाटफार्म क्रमांक २, विंडो, पार्किंग, केटरिंग, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. नगर रेल्वे स्टेशनजवळ खुल्या जागेवर शॉपिंग हॉल व आधुनिक हॉस्पिटलसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिर्डी-पंढरपूरला जाणारी शिर्डी पॅसेंजर राहुरी, बेलवंडी व श्रीगोंदा येथे थांबा मिळण्याबाबत मागणी करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
हे हवे आहे...
पुणे-गोरखपूर, पुणे-लखनऊ एक्प्रेसला नगर थांबा
साप्ताहिक रेल्वे रोज सुरू करणे
कोल्हापूर-गोंदिया गाडीला ए.सी. बॉक्स
शिर्डी-मुंबई गाडीला ७ ऐवजी २२ डबे जोडणे
बेलापूर-नेवासा-शेवगाव-बीड-परळी-लाईन
दौंड-मनमाड रेल्वे लाईनवर बेलवंडी फाट्यावर उड्डाणपूल
नगर-पुणे शटल सेवा

Web Title: Hope for the city-Pune shuttle service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.