सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:06 IST2021-01-08T05:06:31+5:302021-01-08T05:06:31+5:30
कर्जत : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे भाजप ओबीसी सेल महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ...

सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान
कर्जत : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कर्जत येथे भाजप ओबीसी सेल महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. भाजप ओबीसी महिला मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्षा डॉ. कांचन राजेंद्र खेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भामा राऊत, नगराध्यक्षा प्रतिभा भैलुमे, राशीन सरपंच नीलम साळवे, निलावती शिंदे, सीताबाई राजगुरू यांचा प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षस्थानी ओबीसी मोर्चा दक्षिण जिल्हाध्यक्ष संतोष रायकर होते. यावेळी नगरसेविका उषा राऊत,नगरसेविका हर्षदा काळदाते, नगरसेविका राखी शहा, नगरसेविका वृषाली पाटील, नगरसेवक अक्षय राऊत, उत्तर विभाग संपर्कप्रमुख विनोद दळवी, तालुकाध्यक्ष मनीषा वडे, सरचिटणीस आशा क्षीरसागर, ॲड. प्रतिभा रेणुकर, आशा वाघ, डॉ. अश्विनी राऊत, अश्विनी दळवी, अनिता चिंचकर, सुनील यादव, डॉ. विलास राऊत आदी उपस्थित होते.