पिंपळगाव तुर्क येथे उल्लेखनिय कार्य करणारांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:37 IST2021-02-06T04:37:27+5:302021-02-06T04:37:27+5:30
कान्हूर पठार : पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे आर्यवीर फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाळुंज यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य ...

पिंपळगाव तुर्क येथे उल्लेखनिय कार्य करणारांचा सन्मान
कान्हूर पठार : पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे आर्यवीर फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाळुंज यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी आर्यवीर फाउंडेशनचे उद्घाटनही करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पारनेर तालुका पत्रकार संघाचे संस्थापक संजय वाघमारे होते. यावेळी पारनेर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शरद झावरे, दत्ता गाडगे, ज्येष्ठ पत्रकार दत्ता उनवणे, भिकाजी धुमाळ, फिनिक्स युवा विकास प्रतिष्ठानचे संस्थापक विलास महाराज लोंढे, एकनाथ वाळुंज, माजी सरपंच सरदार शेख, शांताबाई महादेव वाळुंज, सुभाष गोविंद वाळुंज, विलास महाराज लोंढे, विनोद गायकवाड, सनी सोनावळे, शशिकांत भालेकर, संतोष सोबले, श्रीकांत ठुबे, कारभारी बाबर, सतीश ठुबे, लतिफ राजे, राम तांबे, अरुण गायकवाड, श्रीनिवास शिंदे, सुनील नाईकवडी, सतीश परांडे, सुनील टोपले, ओमप्रकाश देंडगे, प्रसाद खिलारी आदी उपस्थित होते.
नूरमोहम्मद शेख या विद्यार्थ्याचा क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व प्रवीण वाळुंज व उषा गायकवाड यांचा कोरोना काळातील कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला. सावजी सोबले यांचा सुभेदार मेजरपदी निवड झाल्याबद्दल विशेष सन्मान करण्यात आला. यांची प्रमुख उपस्थिती होती. अमोल गवळी यांनी सूत्रसंचालन केले. गोकुळ वाळुंज यांनी आभार मानले.
फोटो : ०५ कान्हूर पठार
पारनेर तालुक्यातील पिंपळगाव तुर्क येथे आर्यवीर फाउंडेशनचे अध्यक्ष अरुण वाळुंज यांच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारांचा सन्मान करण्यात आला.