कोपरगावात पत्रकारांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:43+5:302021-01-08T05:04:43+5:30
कोपरगाव : तालुक्यातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांना माजी पोलीस अधीक्षक के.पी. रोकडे व ...

कोपरगावात पत्रकारांचा सन्मान
कोपरगाव : तालुक्यातील ओम साई ग्रामीण शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त तालुक्यातील पत्रकारांना माजी पोलीस अधीक्षक के.पी. रोकडे व संस्थेचे अध्यक्ष प्रशांत साबळे यांच्या हस्ते बुधवारी ( दि. ६ ) शाल, पुष्पगुच्छ तसेच कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी गणेश दाणे, मनीष जाधव, विजय कापसे, शंकर दुपारगुडे, दीपक जाधव, फकीरा टेके, जनार्धन जगताप, रवींद्र साबळे, अक्षय काळे, विनोद जवरे, मधुकर वक्ते, अनिल दीक्षित, हाफिज शेख, स्वप्निल कोपरे, सिद्धार्थ मेहरखांब, युसूफ रंगरेज, बिपीन गायकवाड, पंडित भारूड यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या सचिव सुचित्रा साबळे, साई शक्ती इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य विजय जाधव, विलास चव्हाण, सोनाली कापसे, निलेश देवकर, रेखा दिवे आदी उपस्थित होते.