कोपरगावात महिला शिक्षिकांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:04 IST2021-01-08T05:04:25+5:302021-01-08T05:04:25+5:30
कोपरगाव : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा हा एक ...

कोपरगावात महिला शिक्षिकांचा सन्मान
कोपरगाव : भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्य शासनाने सावित्रीबाई फुले यांचा जयंती सोहळा हा एक आगळावेगळा उत्सव रूपाने सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याचाच एक भाग म्हणून कोपरगाव येथील सेवानिवृत्त आदर्श प्राचार्य गोरक्षनाथ वर्पे व आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका प्रमिलाताई वर्पे यांच्या विचार प्रेरणेतून व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्या पुढाकाराने कोपरगाव नगर परिषद शिक्षण मंडळ शाळेतील ४० महिला शिक्षकांचा पुष्पगुच्छ आणि पेन देऊन नुकताच गौरव करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या सेवानिवृत्त प्राचार्या ललिता सरवार होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजय बंब, एस. जी. विद्यालयाचे विश्वस्त संदीप अजमेरे, माजी नगरसेविका रमाबाई पहाडे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, नगरसेविका प्रतिभा शिलेदार, नगरसेवक मंदार पहाडे, पिपल्स बँकेचे संचालक सुनील शिलेदार, महाराष्ट्र परिट (धोबी) सेवा मंडळाचे राज्य संपर्कप्रमुख गणेश गायकवाड, आनंद जगताप, रवींद्र चिंचपुरे, लक्ष्मण सताळे, रवींद्र राऊत, आनंद टिळेकर, आकाश डागा आदी उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असल्याचे संदीप वर्पे यांनी सांगितले.
या कार्यक्रमास मुख्याध्यापिका शोभा गाडेकर, मंगल बिबवे, शबनम शेख, कल्पना निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सरस्वती कानडे, विमल वाणी, स्मिता सोमासे, रजनी खैरनार, गीतांजली चौधरी, ज्योती पवार, साखराबाई साळुंखे, कल्पना बच्छाव, प्रताप वळवी, अमित पराई, मुबश्शीर शेख यांच्यासह सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत संगीता संदीप वर्पे यांनी केले. अनुराधा सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.
...................
फोटो०५- महिला शिक्षिका सन्मान, कोपरगाव