द्राक्ष उत्पादक राहुल रसाळ यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:28 IST2021-02-05T06:28:25+5:302021-02-05T06:28:25+5:30
निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील कृषितज्ज्ञ राहुल रसाळ यांचा उत्कृष्ट द्राक्ष उत्पादक म्हणून पुणे येथील भाकरूप राष्ट्रीय द्राक्ष संशोधन ...

द्राक्ष उत्पादक राहुल रसाळ यांचा सन्मान
निघोज : निघोज (ता.पारनेर) येथील कृषितज्ज्ञ राहुल रसाळ यांचा उत्कृष्ट द्राक्ष उत्पादक म्हणून पुणे येथील भाकरूप राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या वतीने २५ व्या स्थापना दिनानिमित्त पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
राहुल रसाळ यांनी आतापर्यंत शेतीमध्ये विविध आधुनिक प्रयोग केले. विशेषत: त्यांनी निर्यातक्षम द्राक्ष पिकविले. त्यांना यापूर्वी आयडाॕॅल फार्मर अॕवाॅर्ड, कृषीथॉन, दाभोळकर प्रयोग परिवार, असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उद्यान विद्याचे उपसंचालक डाॅ. ए. के. सिंग, कुलगुरू डाॕॅ. एच. पी. सिंग, पी. सुरेश बाबू आदी उपस्थित होते. डाॕॅ. आर. जी. सोमकुवर यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.
वडील अमृता रसाळ यांचे अहमदनगर, पुणे जिल्ह्यात कृषी क्षेत्रात असलेल्या नावाला साजेशे काम केल्याचे समाधान मिळत असल्याचे राहुल रसाळ यांनी सांगितले.
या पुरस्काराबद्दल आमदार नीलेश लंके, निघोज परिसर कृषी फलोद्यान संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत लामखडे, उपाध्यक्ष अमृता रसाळ, कन्हैय्या उद्योग समूहाचे संस्थापक शांताराम लंके, माजी सरपंच ठकाराम लंके, माजी उपसरपंच रामदास रसाळ, मळगंगा नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष प्रभाकर कवाद, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंतराव कवाद, उपाध्यक्ष नामदेव थोरात आदींनी त्यांचे कौतुक केले.
फोटो ओळ : २५ निघोज अवाॅर्ड
पुणे येथील कार्यक्रमात पी. सुरेश बाबू यांच्या हस्ते कृषितज्ज्ञ राहुल रसाळ यांचा सन्मान करण्यात आला.