गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार
By Admin | Updated: July 11, 2014 00:56 IST2014-07-11T00:35:25+5:302014-07-11T00:56:31+5:30
अहमदनगर : लोकमत आयोजित व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शुक्रवारी (दि.११) ३ वाजता सत्कार करण्यात येणार आहे.

गुणवंत विद्यार्थ्यांचा आज सत्कार
अहमदनगर : लोकमत आयोजित व पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन प्रायोजित दहावी व बारावीच्या परीक्षेत ९० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शुक्रवारी (दि.११) ३ वाजता सत्कार करण्यात येणार आहे.
विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कॉलेज आॅफ नर्सिंग आॅडिटोरिअम येथे हा सत्कार होणार असून मुख्याध्यापकांचाही सत्कार होणार आहे़ विद्यार्थ्यांनी गुणपत्रिकेच्या झेरॉक्ससह उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे़
आयबीएमआरडीचे संचालक डॉ. अरुण इंगळे, एन. बी. धुमाळ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील़ कार्यक्रमास उपस्थित रहावे व अधिक माहितीसाठी लोकमत भवन, पत्रकार चौक, सावेडी येथे किंवा ९८६०५३४४१४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे़
(प्रतिनिधी)