‘मनसे’कडून वीज बिलांची होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 15:09 IST2017-09-01T15:08:52+5:302017-09-01T15:09:45+5:30
कोपरगाव : अवास्तव वीज बिले आल्याने संतप्त झालेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी केली.

‘मनसे’कडून वीज बिलांची होळी
कोपरगाव : अवास्तव वीज बिले आल्याने संतप्त झालेल्या महाराष्टÑ नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सकाळी ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी केली.
गेल्या अनेक दिवसांपासून महावितरणकडून चुकीच्या पध्दतीने मीटर रिडींग घेतले जात असल्याने सर्वसामान्य घरगुती ग्राहकांना हजारोंच्या पटीत बोगस वीज बिले दिली जात आहेत. यासंदर्भात ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाºयांकडे विचारणा केली असता उलट-सुलट उत्तरे मिळतात. तर ग्राहकांचे काहीही ऐकून न घेता बोगस बिले भरण्यास भाग पाडले जाते. वीज वापर फारसा नसताना अवास्तव बिले मिळत असल्याने शुक्रवारी सकाळी मनसेचे तालुकाध्यक्ष अनिल गायकवाड, शहराध्यक्ष सतीश काकडे, अलिम शहा यांच्या नेतृत्वाखाली ‘महावितरण’ कार्यालयासमोर विद्युत दिवे फोडून वीज बिलांची होळी करण्यात आली. महावितरणचे सहायक अभियंता दिगंबर वर्पे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रघु मोहिते, अनिल गाडे, सतीश खरात, संजय जाधव, सुजल चंदनशिव, बंटी सपकाळ, प्रवीण लहिरे, सचिन खैरे, संतोष लहिरे, अशोक दुसाने, छोटू पठाण, गणेश जाधव, नितीन त्रिभुवन, राहुल सुपेकर, संजय जळगावकर, पप्पू थोरात, बापू काकडे, योगेश गंगवाल, ऋषी दिघोळकर, अजमत सय्यद आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.