एएनएम कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:26 IST2021-09-09T04:26:43+5:302021-09-09T04:26:43+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ५९७ एएनएम भगिनींना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. नगर ...

एएनएम कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषदेवर धरणे
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील ५९७ एएनएम भगिनींना सेवा समाप्तीचे आदेश देण्यात आले. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात कर्मचारी रस्त्यावर उतरले आहेत. नगर जिल्ह्यात बुधवारी एएनएम कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून या घटनेचा निषेध व्यक्त केला. एएनएम भगिनींचे सेवा समाप्तीचे आदेश तत्काळ थांबवावे, या मागणीचे निवेदन आरोग्य सेवा संचालकांना पाठवण्यात आले. सकारात्मक निर्णय न झाल्यास समन्वय समितीच्या नेतृत्वात राज्यभरातून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सर्व कर्मचारी जवळपास ३५०० ते ४००० च्या संख्येने स्वखुशीने विभागाच्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध मुंबईत आरोग्य भवनात १४ सप्टेंबरपासून उपोषण करण्यात येईल, असा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला.
----------
फोटो - ०८ आरोग्य कर्मचारी आंदोलन
राष्ट्रीय आरोग्य अभियानातील एएनएम भगिनींना सेवा समाप्तीचे आदेश दिल्याने नगर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त केला.