निविदा ठेवा बाजूला.. आधी खड्डे बुजवा

By Admin | Updated: July 27, 2016 00:38 IST2016-07-27T00:09:19+5:302016-07-27T00:38:03+5:30

अहमदनगर : खड्डे बुजविण्यासाठी फेरनिविदा काढली आहे, असे सांगून वेळ मारून नेऊ नका. खड्डे कसे बुजवायचे, त्याचे नियोजन करा

Hold the tender on the side .. before digging pits | निविदा ठेवा बाजूला.. आधी खड्डे बुजवा

निविदा ठेवा बाजूला.. आधी खड्डे बुजवा


अहमदनगर : खड्डे बुजविण्यासाठी फेरनिविदा काढली आहे, असे सांगून वेळ मारून नेऊ नका. खड्डे कसे बुजवायचे, त्याचे नियोजन करा. बांधकाम विभागानेच खड्डे बुजविण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, असे आदेश उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी महापालिकेच्या अभियंत्यांना दिले आहेत.
शहरातील खड्ड्यांबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमहापौरांनी मंगळवारी सायंकाळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. निविदा, फेरनिविदा, ठेकेदाराचा नकार, वाढीव दर आदी कारणे अधिकाऱ्यांकडून सांगितली जात आहेत. नागरिकांना कारणे सांगण्यासाठी आम्ही येथे बसलेलो नाहीत. कोणत्याही परिस्थितीत खड्डे बुजविण्याचे काम तत्काळ हाती घ्यावे, अशा शब्दात छिंदम यांनी महापालिकेच्या कारभाराचा समाचार घेतला. शहरातील अनेक रस्त्यांवर पथदिवे बंद आहेत. दोन- तीन महिन्यांपासून विद्युत साहित्य उपलब्ध नाही. त्यामुळे विद्युत दुरुस्तीची कामे बंद आहेत. रस्त्यावर अंधार असल्याने नागरिक भयभीत आहेत. याचाही विचार करा, असे छिंदम यांनी सांगितले. मात्र विद्युत पुरवठादारांची देणी थकली असल्याने त्यांनी साहित्याचा पुरवठा बंद केला आहे, असे अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितले. त्यामुळे शहरात दिवे बसविण्याची मागणी पूर्ण करण्यात अडथळे येत आहेत.
यावेळी उपमहापौर म्हणाले, शहरातील रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामासाठी मागविलेल्या फेरनिविदेस विलंब लागणार आहे. त्यामुळे बांधकाम विभागानेच खड्डे बुजविण्याचे काम हाती घ्यावे. ज्या ठेकेदाराने रस्त्याचे काम केले, त्याच ठेकेदाराला रस्त्याच्या पॅचिंगचे काम दिले तर काम अधिक चांगले होईल. विद्युत पुरवठादाराला दरमहा ठरावीक रक्कम दिली तर कामे सुरू राहतील, अशी सूचना छिंदम यांनी मांडली.
या बैठकीला उपायुक्त भालचंद्र बेहरे, शहर अभियंता विलास सोनटक्के, मुख्य लेखा परीक्षक अनारसे, मुख्यलेखाधिकारी राजेंद्र झिरपे, आर. जी. सातपुते, प्रभाग अभियंता मनोज पारखे, श्रीकांत निंबाळकर, बाळासाहेब सावळे आदी उपस्थित होते. दोन दिवसांनी छिंदम पुन्हा आढावा घेणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Hold the tender on the side .. before digging pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.