भाच्याची पत्नी पळविणारा मामा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 18:23 IST2017-10-02T16:01:49+5:302017-10-02T18:23:57+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या मामाने डोंबिवलीत राहणाºया भाच्याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणून श्रीगोंद्यातील काळकाई चौकात ठेवले होते. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरुन डोंबिवली पोलिसांनी मामास अटक करुन पत्नीला चौकशीसाठी सोमवारी ताब्यात घेतले आहे.

भाच्याची पत्नी पळविणारा मामा गजाआड
श्रीगोंदा (अहमदनगर) : श्रीगोंदा तालुक्यातील लिंपणगाव येथील रहिवासी असलेल्या मामाने डोंबिवलीत राहणाºया भाच्याच्या पत्नीला फूस लावून पळवून आणून श्रीगोंद्यातील काळकाई चौकात ठेवले होते. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून डोंबिवली पोलिसांनी आरोपी मामास अटक करून पत्नीला चौकशीसाठी सोमवारी ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांची माहिती अशी, की मामा-भाचे यांचे मूळ गाव लिंपणगाव. पण व्यवसाय व नोकरीनिमित्ताने ते डोंबिवलीत राहतात. मामाचे किराणा दुकान आहे. भाचा एका खासगी कंपनीत नोकरीस आहे. भाच्याला दोन मुली, एक मुलगा आहे. मामाचे भाच्याच्या पत्नीशी सहा महिन्यांपासून सूत जुळले. ९ सप्टेंबर रोजी मामाने भाच्याच्या पत्नीला श्रीगोंद्यात पळवून आणून एका खोलीत ठेवले. त्यानंतर भाच्याने पत्नी हरवल्याची तक्रार डोंबिवली पोलीस ठाण्यात दिली. दरम्यानच्या काळात मामाही गायब झाला होता. मामाने आपल्या पत्नीला पळवून नेल्याचे भाच्याच्या लक्षात आले. मोबाईल टॉवर लोकेशनच्या आधारे दोघांना पोलिसांनी श्रीगोंद्यात पकडले. याप्रकरणी भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.