‘त्यांचा’ बोलविता धनी वेगळाच
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:28:43+5:302014-08-01T00:22:28+5:30
सोनई : शासकीय पातळीवर प्रयत्न करुन नेवासा तालुक्यासाठी पाटपाणी आणले. याला दरोडा म्हणणारांचा बोलविता धनी वेगळाच आहे. याची सर्व ज्येष्ठ व युवकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन शंकरराव गडाख यांनी केले.
‘त्यांचा’ बोलविता धनी वेगळाच
सोनई : शासकीय पातळीवर प्रयत्न करुन नेवासा तालुक्यासाठी पाटपाणी आणले. याला दरोडा म्हणणारांचा बोलविता धनी वेगळाच आहे. याची सर्व ज्येष्ठ व युवकांनी माहिती घ्यावी, असे आवाहन आमदार शंकरराव गडाख यांनी केले.
सोनई येथे आयोजित ५२ युवक मित्र मंडळाच्या संयुक्त मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी काकासाहेब डफाळ होते.
टीकेला भीक नाही
गडाख म्हणाले, माझ्यावर इतर तालुक्याचे लोक बोलतात, पाटपाण्याविषयी आरोप करतात. थोडेफार पाटपाणी मी माझ्या तालुक्यासाठी जास्त घेतले असेल, परंतु त्याला दरोडा म्हणणारांचे बोलविता धनी वेगळेच आहेत. त्यांच्या टीकेला मी भीक घालत नाही. जिल्ह्यात मोठे राजकारण शिजत आहे. विरोधकांचा वेगळा कावा आहे. सर्वांनी एकत्रित रहावे म्हणूनच गुरुवारी सोनई व दोन आॅगस्टला नेवासा फाट्यावर युवक मेळावा आयोजित केल्याचे गडाख यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गुंड, जिल्हा परिषद सदस्य सुनील गडाख, राजेंद्र गायकवाड, नितीन दरंदले, सरपंच सखाराम वाघ, पांडुरंग अनारसे, जालिंदर एळवंडे, सुदाम तागड, गणेश गडाख, अॅड. सयाराम बानकर, हभप गोविंद निमसे, जि.प. सदस्य राजेंद्र गुंड यांचीही भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणातून गडाख यांच्या कार्याचा आढावा घेतला.
मेळाव्यास विश्वासराव गडाख, शिवाजी तरुण मंडळाचे ज्येष्ठ सदस्य अरुण दरंदले, मुळा बँकेचे अध्यक्ष रेवननाथ निमसे, बाबासाहेब भोगे, पंचायत समिती सदस्य राजेंद्र गुगळे तसेच सोनई परिसरातील युवक, पदाधिकारी हजर होते.
(वार्ताहर)