हिमगौरी आणि सात बुटक्यांनी केली धमाल
By Admin | Updated: June 25, 2014 00:31 IST2014-06-24T23:36:37+5:302014-06-25T00:31:20+5:30
लोकमत बाल विकास मंच: युवाशक्ती प्रतिष्ठानचे सहकार्य
हिमगौरी आणि सात बुटक्यांनी केली धमाल
अहमदनगर : लोकमत बाल विकास मंचच्या वतीने खास बाल विकास मंचच्या सदस्यांसाठी ‘‘हिमगौरी आणि सात बुटके’’ या भन्नाट बालनाटकाचे आयोजन करण्यात आले होते. सहकार सभागृहात रंगलेल्या या नाटकात बालसदस्य तल्लीन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात व लकी ड्रॉ चा प्रारंभ लोकमतचे संस्थापक संपादक स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी राम एजन्सीचे राम मेघानी, मराठा सायकल सेंटर, माणिक चौकचे गोपाल भागवाणी, साई स्पोर्टस्चे शैलेश गवळी, डी. एम. मुळे चष्मावालाचे मुकुंद मुळे या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. पल्लवी राणा यांनी या नाटकाची निर्मिती केली असून, शुभांगी त्रिगुणे यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच राजा राणा हे या नाटकाचे लेखक, सूत्रधार होते. या कार्यक्रमाकरिता सर्व मुलांना मोफत प्रवेश देण्यात आला होता. हिमगौरी आणि सात बुटके या बालनाट्यात सर्व शालेय विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. सर्व मुलांना राणी, चेटकीण, सात बुटके यांची कहाणी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. बालनाट्य प्रबोधनात्मक असून, मुलांना मनोरंजनात्मक ही ठरले. आजच्या इलेक्ट्रॉनिक संगणक व अॅन्ड्रॉईडच्या युगात मुले व्हिडिओ गेम्समध्ये गुरफटत चालली आहेत आणि बालनाट्य सारख्या प्रबोधनात्मक नाटीका लोप पावत चालल्या आहेत. त्यामुळेच लोकमत बाल विकास मंचने मुलांना इलेक्ट्रॉनिक दुनियातून बाहेर काढून बालनाट्य सारख्या नाटिकाचे मनोरंजन व प्रबोधन करण्यात आले. बालमंचच्या सभासद मुलांनी नाटकातील चेटकिनिस पळता भुई केली. कार्यक्रमाचा मुलांनी व पालकांनी मनमुराद आनंद घेतला.
याचबरोबर लोकमत बाल विकास मंच २०१३-१४ चा कोण बनेल स्मार्ट लकी ड्रॉची सोडत कार्यक्रम स्थळी काढण्यात आली. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक युवा शक्ती प्रतिष्ठान होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल बागूल यांनी केले.(प्रतिनिधी)