राज्यमार्गांना घरघर
By Admin | Updated: July 8, 2014 00:29 IST2014-07-07T23:24:29+5:302014-07-08T00:29:49+5:30
कोतूळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे मुळा विभागाच्या धमण्या असलेल्या अकोले-कोतूळ व राजूर-बोटा या दोन्ही प्रमुख राज्यमार्गांना घरघर लागली
राज्यमार्गांना घरघर
कोतूळ : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनास्थेमुळे मुळा विभागाच्या धमण्या असलेल्या अकोले-कोतूळ व राजूर-बोटा या दोन्ही प्रमुख राज्यमार्गांना घरघर लागली जागोजागी पडलेले खड्डे व खचलेल्या साईड पट्ट्यांमुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे.
अकोले तालुक्यातील महत्वाचे समजले जाणारे मुळा विभागातील अकोले- सुगाव-पिंपळगाव खांड-कोतूळ व राजूर-कोतूळ-ब्राह्मणवाडा-बदगी बेलापूर-बोटा हे दोन्ही राज्यमार्ग गेल्या अनेक वर्षांपासून कामाच्या प्रतीक्षेत आहेत. तालुक्याच्या दक्षिणेस एका बाजूला असल्याने या रस्त्यांकडे लोकप्रतिनिधींसह सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष असते. परिणामी रस्ता जागोजागी उखडून अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्यांचा भराव खचल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा एक ते तीन फुटापर्यंत लांबलचक खड्डे पडले आहेत. त्यामुळे अंधारात साईडट्ट्या नजरेस न पडल्यास दुचाकी-चारचाकी वाहने उलटून अपघात होण्याचे प्रमाण वाढत आहे. रस्त्याच्या कडेची झाडे पुढे आल्याने लटकलेल्या फांद्यांमध्ये धोकादायक वळणावर समोरील वाहने दिसत नाहीत.
कोतूळ-राजूर रस्ता राजूर सार्वजनिक बांधकाम उपविभागांतर्गत येतो. परंतु उपविभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना या रस्त्याचे काहीही घेणे-देणे नाही, असे दिसते. कोतूळ-अकोले रस्त्यावर पिंपळगाव खांडपर्यंत खड्डेच खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्यावरील वाहतुकीचे प्रमाण अधिक असूनही त्याची दुरूस्ती होत नाही. रस्त्यावर सूचना फलक नाहीत. कोतूळ ते ब्राह्मणवाडा-बोटा दरम्यान या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागते.
पावसाळा येऊन ठेपला तरी मुळा विभागातील प्रमुख रस्त्यांची डागडुजी झालेली नाही, हे विशेष. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी मुळा परिसरातील नागरिकांनी केली आहे.
(वार्ताहर)
अकोले-कोतूळ रस्त्याच्या कामाचे प्रस्ताव दरवर्षी पाठविले जातात. सध्या तरी या कामास मंजुरी मिळालेली नाही. अर्थसंकल्पात तरतूद झाल्यावर काम होऊ शकेल.
-प्रवीण नाईक, उपअभियंता.
कोतूळ ते ब्राह्मणवाडा-बोटा दरम्यान या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहतूक करावी लागते.
रस्त्याच्या कडेची झाडे पुढे आल्याने लटकलेल्या फांद्यांमध्ये धोकादायक वळणावर समोरील वाहने दिसत नाही.