शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

ये तो ट्रेलर; पिक्चर अभी बाकी है : सुजय विखे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 19:22 IST

जिल्हा बँक निवडणुकाचा हा ट्रेलर होता. नगर परिषद निवडणुकीत पूर्ण पिक्चर दाखवू, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.

जामखेड : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत जामखेडची जागा बिनविरोध केली. कर्जतच्या जागेसाठी  ४५ ठराव असलेले लोक विरोधकांनी  सोबत नेले. मतमोजणीत ते ३६ कसे झाले हे कोडे त्यांना अजूनही उमजेना. जिल्हा बँक निवडणुकाचा हा ट्रेलर होता. नगर परिषद निवडणुकीत पूर्ण पिक्चर दाखवू, असा टोला खासदार डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांना लगावला.

जामखेड येथे शुक्रवारी भाजप कार्यकर्त्यांचा स्नेहमेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. जिल्हा बँक संचालक  अमोल राळेभात यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

विखे म्हणाले, केंद्र सरकारकडून अहमदनगर  लोकसभा मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला. मात्र, त्याची प्रसिद्धी केली नाही. परंतु, येथील आमदार निधी मीच आणला, असे सोशल मीडियावर सांगत आहेत. जे काम आपण केले नाही, त्याचे श्रेय घेऊ नये. मागील वर्षभरात आमदारांनी एकही काम केले नाही. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केलेल्या कामांचे उद्घाटन ते करीत आहेत.

यावेळी खासदार निधीतून जामखेड तालुक्याला दिलेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण विखे यांच्या हस्ते झाले.  सूत्रसंचालन प्रवीण सानप यांनी केले. मनोज कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नेते जगन्नाथ राळेभात, विठ्ठल राऊत, भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवक अध्यक्ष शरद कार्ले, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे उपस्थित होते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरJamkhedजामखेडSujay Vikheसुजय विखेRohit Pawarरोहित पवार