कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी पाळावीत ही चार सूत्रे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:42+5:302021-04-18T04:20:42+5:30

योगिता सत्रे .................. कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना सहजासहजी संपणार ...

Here are four tips to help you avoid coronary heart disease | कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी पाळावीत ही चार सूत्रे

कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी पाळावीत ही चार सूत्रे

योगिता सत्रे

..................

कोरोनाचा संसर्ग वेगात वाढत आहे. कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना सहजासहजी संपणार नाही. त्यामुळे आपणच कोरोनासोबत जगायची सवय लावायला हवी. मात्र, हे करताना कोरोनाच्या संसर्गापासून वाचण्यासाठी खालील चार सूत्रे प्रत्येकाने पाळलीच पाहिजेत.

१. आहार : रोजच्या आहारात व्हिटॅमिन-सी पदार्थांचा वापर करावा. यात वेगवेगळ्या प्रकारची फळे, भाजीपाला, सॅलडचा कच्च्या स्वरूपात वापर करणे गरजेचे आहे.

२. विहार : रोज एक तास व्यायाम, प्राणायाम करणे जरूरी आहे. यात योगासने, दोरीवरच्या उड्या, चालणे, धावणे याचा समावेश असावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. मास्कचा वापर करावा.

३. झोप : रात्री १० वाजेच्या आत झोपावे. रात्री १० ते १२ वाजेदरम्यान झोपेत मेंदू पुन:निर्मिती प्रणाली कार्यरत करतो. त्यामुळे रात्री १२ वाजेनंतर झोपल्याने रोगप्रतिकारशक्ती क्षीण होते. सकाळी ५ ते ६ वाजेदरम्यान उठावे. लॉकडाऊन आहे. काही काम नाही, असे म्हणून उगाचच रात्री उशिरापर्यंत जागून सकाळी उशिरापर्यंत झोपू नये.

४. मन : मन नेहमी प्रसन्न, आनंदी आणि सकारात्मक ठेवावे. २१ मिनिटे ध्यान करावे. इतरांसाठी नि:स्वार्थ प्रार्थना करावी. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार कोरोना विषाणूचे तरंग ०५.५ हर्टझ् आहे आणि तो २५.५ हर्टझला मरतो, तर मानवी मनातील भीती, चिंता, चिडचिड व नकारात्मकता आपले तरंग कमी करतात. म्हणूनच सर्व आहार- विहार व झोप व्यवस्थित असतानाही काही लोक आजारी पडतात. कारण त्यांनी मन या बाबीवर लक्षच दिलेले नसते. जेव्हा तुम्ही हसता, नाचता, गाता, प्रार्थना किंवा ध्यान, योगा करता तेव्हा मानवी तरंग हे १२०-३५० हर्टझ् असतात. त्यामुळे या चार सूत्रांचा वापर करून कोरोनाला रोखणे शक्य होणार आहे.

Web Title: Here are four tips to help you avoid coronary heart disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.