शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
4
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
5
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
6
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
7
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
8
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
9
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
10
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
11
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
12
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
13
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
14
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
15
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
16
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
17
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
18
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
19
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
20
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
Daily Top 2Weekly Top 5

निराधार धोंडाबाईसाठी मदतीचा ओघ

By admin | Updated: December 15, 2015 23:16 IST

सोनई : येथील निराधार धोंडाबाई पवार यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था करण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे.

सोनई : येथील निराधार धोंडाबाई पवार यांना अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था करण्याची तयारी अनेकांनी दर्शविली आहे. नगर येथील शिंगवे नाईक भागातील इंद्रधनू प्रकल्पांतर्गत निराधारांसाठी आश्रय देणाऱ्या माउली प्रतिष्ठानचे डॉ. राजेंद्र आणि सुचेता धामणे या दाम्पत्याने धोंडाबाईच्या संपूर्ण पालनपोषणाची जबाबदारी उचलण्यासाठी पुढाकार घेतला. कुणी घर देता का घर ! या मथळ्य़ाखाली ‘लोकमत’ मध्ये (१५ डिसेंबर) वृत्त प्रसिध्द होताच धोंडाबाईच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले. सोनई येथील जुन्या पोस्ट कार्यालय आवारात राहत असलेल्या धोंडाबाई चंद्रकांत पवार या पासष्ट वर्षीय महिलेवर सध्या अत्यंत हलाखीचे जीवन जगण्याची दुदैर्वी वेळ येऊन ठेपली आहे. अनेक वर्षांपूर्वी पतीचा आधार गेला. वार्धक्यामुळे तिला हल्ली काहीच काम होत नाही. परिणामी तिच्या खाण्या-पिण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवत येथील महिला सामाजिक कार्यकर्त्या द्वारका कुमावत यांनी धोंडाबाईला त्यांच्या घरी तात्पुरता आधार दिला आहे. दरम्यान, धोंडाबाईच्या या कर्मकहाणीची दखल घेत डॉ. धामणे यांनी तिचा सांभाळ करण्याची तयारी दर्शविली. त्यांनी सोनईचे अंबादास राऊत यांच्याशी संपर्क साधून धोंडाबाईची विचारपूस केली. त्यानुसार राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धोंडाबाईच्या उर्वरित आयुष्याची तरतूद करण्यासाठी डॉ. धामणे यांच्याशी चर्चा केली. लवकरच धोंडाबाईला शिंगवेनाईक येथील त्यांच्या आश्रमात घेऊन जाण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे या चर्चेदरम्यान धामणे यांनी सांगितले. यावेळी सोनईचे माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन दरंदले, माजी सरपंच दादासाहेब वैरागर, मनोज वाघ, चंद्रकांत राऊत, आशा कर्डिले आदी उपस्थित होते. वृद्धत्वामुळे धोंडाबाईचे हात-पाय सुजत आहे. प्रतिकारशक्ती कमी झाली असून, शरीरात रक्तही राहिलेले नाही. खायला वेळेवर मिळत नाही. त्यामुळे धोंडाबाईच्या आजारपणातही सातत्याने वाढ होत आहे. धोंडाबाई हिचा संसार एका लोखंडी ड्रममध्ये ठेवलेला असून दिवसभर हिंडून भीक मागून ती उदरनिर्वाह करते. विशेष म्हणजे ज्यांच्या घरी तिने तब्बल दहा वर्षे धुणीभांडी केली, त्यांनीच तिला आधार देण्यास असमर्थता दर्शविली. अगदी तिचे जवळचे नातेवाईकच तिला विचारीनासे झाल्याने एखाद्या वृद्धाश्रमात जाऊन राहण्याची तिने तयारी दर्शविली होती. आता तिच्यासाठी मदतीचे हात सरसावल्याने तिच्या जीवनमानात आता बदल होणार आहेत. (वार्ताहर)