हेल्प पीपल्स ग्रुपची कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:25 IST2021-04-30T04:25:45+5:302021-04-30T04:25:45+5:30
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथे प्रशासनाने शासकीय कोविड सेंटर ...

हेल्प पीपल्स ग्रुपची कोविड सेंटरला मदत
बोधेगाव : शेवगाव तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन व त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथे प्रशासनाने शासकीय कोविड सेंटर सुरू केले आहे. येथील रुग्णांना मदतीचा हात देण्यासाठी हेल्प पीपल्स ग्रुप व शेवगाव तालुका पत्रकार संघाने पुढाकार घेऊन ५१ हजार रुपये किमतीचे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य व औषधे दिली. तहसीलदार अर्चना पागिरे यांच्याकडे बुधवारी साहित्य व औषधी सुपुर्द करण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी महेश डोके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. सलमा हिराणी, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. रामेश्वर काटे, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कैलास बुधवंत, नायब तहसीलदार मयूर बेरड, विस्तार अधिकारी शैलेजा राऊळ, सुरेश पाटेकर, डाॅ. विजय लांडे, पत्रकार संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब बर्गे, इलेक्ट्राॅनिक मीडिया तालुकाध्यक्ष संदीप देहाडराय आदी उपस्थित होते. हेल्प पीपल्स ग्रुपचे अविनाश ढोले, काशीनाथ यलामली, उमेश शेलगावकर, राजेंद्र भांगळे, अमोल गुंजाळ, प्रदीप पुजारी, कलीम बेग तसेच शेवगाव पत्रकार संघाचे प्रा. सुनील आढाव, जगन्नाथ गोसावी, अर्जुन चेमटे, महादेव दळे, संजय सुपेकर, बाळासाहेब जाधव, राजू श्रीवास्तव, नानासाहेब चेडे, बाळासाहेब खेडकर, सुरेश काटे, उद्धव देशमुख, अनिल कांबळे, दीपक खोसे, जलाल शेख, बाळासाहेब पानकर, रणजीत घुगे, गणेश झिरपे, कपिल शेख, जमीर पठाण आदींसह ३० सदस्यांनी ५१ हजार रुपयांची मदत जमा केली. यातून सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज, वाफेचे मशीन, स्पिरीट, कफ सिरफ, इंजेक्शन, औषधे असे अत्यावश्यक वैद्यकीय साहित्य खरेदी करून तालुका प्रशासनाकडे सुपुर्द केले.