आजोबाच्या मदतीने मुलाने केला वडिलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:15 IST2021-06-11T04:15:16+5:302021-06-11T04:15:16+5:30

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव ...

With the help of the grandfather, the son killed the father | आजोबाच्या मदतीने मुलाने केला वडिलाचा खून

आजोबाच्या मदतीने मुलाने केला वडिलाचा खून

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील बाबुराव छबुराव निकम (वय ५१) हे गुरुवारी सकाळी आपल्या मोटारसायकलसह सुरेगाव शिवारातील कोळगाव थडीकडे जाणाऱ्या रस्त्यालगत संजय दामोदर निकम यांच्या उसाच्या शेतीजवळील एका नाल्यात मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती पोलीस पाटील संजय वाबळे यांना कळवण्यात आली. वाबळे यांनी संबंधीत माहिती कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांना दिली. जाधव यांनी तातडीने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा करत अधिक माहिती घेतली.

बुधवारी रात्री ९ ते सकाळी ७ वाजेच्या दरम्यान बाबुराव निकम यांच्या डोक्यात व शरीराच्या इतर भागावर टणक लोखंडी शस्त्राने जबर मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निदर्शनास आले. मृत बाबुराव निकम यांच्या पत्नी लताबाई बाबुराव निकम यांच्याकडे चौकशी केली असता, सवत झुंबरबाई बाबुराव निकम यांचा मुलगा सोनू ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व त्याचे वडील सोपान लक्ष्मण कोपरे यांनी नेहमीच्या घरगुती वादाच्या रागातून पती बाबुराव निकम यांचा खून केल्याचे लताबाई निकम यांनी सांगितले.

पोलिसांनी लताबाई यांच्या तक्रारीवरून गुरुवारी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये सोनू ऊर्फ प्रफुल्ल बाबुराव निकम व सोपान लक्ष्मण कोपरे यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव हे करीत आहेत.

Web Title: With the help of the grandfather, the son killed the father