शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पाणलोटात पावसाचा जोर; भंडारदरा ७५ टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:11 IST

भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अर्ध्या टीएमसीहून अधिक पाणी येत धरणसाठा ७५ टक्के  झाला.

राजूर / भंडारदरा : भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. गुरुवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत घाटघर येथे साडे सहा इंचाहून अधिक तर रतनवाडी, पांजरे भंडारदरा येथे सुमारे पाच इंच पावसाची नोंद झाली. यामुळे भंडारदरा धरणात चोवीस तासांत अर्ध्या टीएमसीहून अधिक पाणी येत धरणसाठा ७५ टक्के  झाला.

दरम्यान हरिश्चंद्र गडाच्या परिसरातील पर्वत रांगांत जोरदार पर्जन्यवृष्टी होत असल्याने कोतूळ जवळील मुळा नदीच्या विसर्गात वाढ होत आहे. यामुळे या मोसमात पहिल्यांदा मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे. गुरुवारी सकाळी हा विसर्ग १४ हजार ३२२ क्युसेक इतका होता. यामुळे मुळा धरणातही नवीन पाण्याची आवक वाढली आहे.

भंडारदरा धरणात संपलेल्या चोवीस तासांत ५१९ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ८ हजार २३६ दशलक्ष घनफुटापर्यंत पोहचला.

       दरम्यान, कळसुबाई शिखराच्या पर्वत रांगांतही पावसाचा जोर कायम आहे.त्यातच निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाकी येथे ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणातील पाणीसाठा गुरुवारी सकाळी सहा वाजता ५ हजार १४ दशलक्ष घनफूट झाला होता.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRainपाऊसRainपाऊसWaterपाणीDamधरणDamधरण