सुपा परिसरात जोरदार पाऊस
By Admin | Updated: August 24, 2014 02:06 IST2014-08-24T01:59:32+5:302014-08-24T02:06:16+5:30
सुपा : दिर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी सुपा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली़

सुपा परिसरात जोरदार पाऊस
सुपा : दिर्घ विश्रांतीनंतर शुक्रवारी सुपा परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाने दमदार हजेरी लावली़ सायंकाळी ५़५० वाजता सुरु झालेला पाऊस सुमारे दीड तास कोसळत होता़ त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले़ रस्ते, बाजारतळाला तलावाचे स्वरुप आले़
सुपा परिसरात या वर्षी एकही मोठा पाऊस झाला नव्हता़ त्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला होता़ आता रब्बी हंगामही वाया जाण्याची चिंता शेतकऱ्यांना सतावत होती़ मात्र, मघा नक्षत्राने शेतकऱ्यांना दिलासा दिला असून, शुक्रवारी झालेल्या पावसामुळे रब्बीच्या पेरण्या होण्याची आशा निर्माण झाली आहे़
शुक्रवारच्या पावसाने सुपा बसस्थानक, बाजारतळ आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते़ नदी, नाल्यांनाही पूर आला़ सुपा-वाळवणे रस्त्यावरील नदीला पुर आल्याने पुराचे पाणी मोरीवरुन वाहू लागले़ त्यामुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती़ सुपा परिसरात यंदा प्रथमच मोठ्या स्वरुपात पाऊस झाला़ (वार्ताहर)