येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 13:06 IST2019-07-20T13:05:00+5:302019-07-20T13:06:11+5:30
पुढील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वतर्विली आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.

येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात मुसळधार पाऊस
ठळक मुद्देतीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यताकालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार
अहमदनगर : पुढील तीन दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वतर्विली आहे. कालपासून जिल्ह्यात पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे.
शनिवारी अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक, पुणे, नंदुरबार, धुळे या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. रविवारीही पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक राहणार आहे. येत्या तीन दिवसांमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार असल्याने जिल्हा प्रशासन विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
दरम्यान जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. नगर तालुक्यातील विविध भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.