आनंदवाडी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:27 IST2021-06-09T04:27:21+5:302021-06-09T04:27:21+5:30
तालुक्यातील घायपतवाडी येथे आरोग्य उपकेंद्र होते. परंतु, या परिसराचा श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रामध्ये समावेश झाल्यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र बंद पडले ...

आनंदवाडी येथे आरोग्य उपकेंद्र मंजूर
तालुक्यातील घायपतवाडी येथे आरोग्य उपकेंद्र होते. परंतु, या परिसराचा श्रीगोंदा नगरपरिषद क्षेत्रामध्ये समावेश झाल्यामुळे येथील आरोग्य उपकेंद्र बंद पडले होते. हे उपकेंद्र परिसरातील रुग्णांना तसेच गर्भवती महिलांना आरोग्य सेवा मिळणे सोपे व्हावे यासाठी आनंदवाडी येथे स्थलांतरित व्हावे म्हणून आमदार बबनराव पाचपुते यांच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्या पंचशीला गिरमकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला. या उपकेंद्राची आवश्यकता लक्षात घेऊन सार्वजनिक आरोग्य विभागाने नुकताच निर्णय घेऊन तसा आदेश काढला. या आरोग्य उपकेंद्रांसाठी आनंदवाडी ग्रामपंचायतीने जागा उपलब्ध करून द्यावी, उपकेंद्र कार्यान्वित होण्यासाठी तात्पुरती इमारत व्यवस्था तसेच उपकेंद्रांच्या नवीन इमारत बांधकामासाठी नियोजन आणि विकास मंडळाने जिल्हा योजनेतून तरतूद करावी आदी अटींवर आरोग्य उपकेंद्र स्थलांतरित करण्यात आल्याचे शासन निर्णयात म्हटले आहे.
..............
श्रीगोंदा तालुक्यात ३८ आरोग्य उपकेंद्र सुरु असून घायपतवाडी येथील आरोग्य उपकेंद्र आनंदवाडी येथे स्थलांतरित करण्यास मंजुरी मिळाल्यामुळे आरोग्य उपकेंद्रांची संख्या आता ३९ झाली आहे.
-डाॅ. नितीन खामकर, तालुका आरोग्य अधिकारी