शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून लसीकरण सुरु असतानाच अधिकाऱ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2021 17:03 IST

पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली.

करंजी (अहमदनगर) : पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील आरोग्य उपकेंद्रातील अधिकारी डॉ. गणेश गोवर्धन शेळके (वय ४०) यांनी लसीकरण सुरु असतानाच कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान शेळके यांच्याकडे एक सुसाईड नोट आढळून आली असून, त्यात तालुका आरोग्य अधिकारी, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.डॉ. गणेश शेळके हे करंजी येथील आरोग्य उपकेंद्रात समुदाय अधिकारी म्हणून कार्यरत होते. ते बहिरवाडी (ता. नेवासा) येथील रहिवासी होत. मंगळवारी करंजी येथील उपकेंद्रात कोविड लसीकरण सुरु होते. त्यावेळी डॉ. शेळके हे तणावाखालीच असल्याचे जाणवत होते. त्यांनी तेथील कर्मचाऱ्यांना एक कागद व पेन मागितला व उपकेंद्रातील त्यांच्या दालनाचा दरवाजा आतून बंद करुन घेतला. बराचवेळ झाला तरी दरवाजा उघडला गेला नाही. म्हणून कर्मचाऱ्यांनी शेळके यांना आवाज दिला. तरीही त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा सुरु केला. अखेरीस दरवाजा तोडून आत पाहिले असता डॉ. शेळके यांनी फॅनला गळफास घेतल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक कौशल्य वाघ, अरविंद चव्हाण, सतिष खोमणे, भाऊसाहेब तांबे हे घटनास्थळी दाखल झाले. 

गळफास घेवून आत्महत्या करण्याच्या अगोदर डॉ. शेळके यांनी चिठ्ठी लिहुन ठेवली होती. ही चिठ्ठी त्यांच्या हातातच होती. या चिठ्ठीत त्यांनी तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ. भगवान दराडे, तहसिलदार, कलेक्टर व प्रशासनातील वरिष्ठांच्या जाचास कंटाळून आपण आत्महत्या करित असल्याचे लिहिले आहे. वेळेवर पेमेंट न करणे, अतिरिक्त कामाचा भार टाकणे, पेमेंट कपातीच्या धमक्या देणे असे प्रकार वरिष्ठांकडून घडत असल्याचे या चिठ्ठीत म्हटले आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी