आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविणार
By | Updated: December 7, 2020 04:15 IST2020-12-07T04:15:25+5:302020-12-07T04:15:25+5:30
कर्जत : कोरोनाच्या काळात नव्याने रूजू होऊन जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी अहोरात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. या सर्वांचा ...

आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविणार
कर्जत : कोरोनाच्या काळात नव्याने रूजू होऊन जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी अहोरात्र नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली. या सर्वांचा कायम ऋणी आहे. आता आरोग्याबाबत आपल्याला दर्जेदार काम करायचे आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन आ. रोहित पवार यांनी केले.
कर्जत पंचायत समितीमध्ये घेण्यात आलेल्या समूह आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते.
यावेळी पं. स. सभापती अश्विनी कानगुडे, उपसभापती हेमंत मोरे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप पुंड आदी उपस्थित होते.
पवार म्हणाले, कॅन्सर या आजाराने मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. मात्र, या रोगाचे निदान होणे प्रथम गरजेचे आहे. त्यासाठी आपण शिबीर घेणार आहोत. आता आरोग्य अधिकाऱ्यांची संख्या वाढली असून कर्जत व जामखेडसाठी दोन रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कर्जत तालुक्यातील २२ ठिकाणच्या रिक्त जागांवर १९ समुदाय आरोग्य अधिकारी तर ३ आरोग्यसेवक कर्मचारी उपलब्ध झाले आहेत.