नगरसेवकाने प्रभागातील नागरिकांचे बनविले आरोग्य कार्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:14 IST2021-06-19T04:14:57+5:302021-06-19T04:14:57+5:30

शेवगाव : सामाजिक जबाबदारीचे भान, विधायक कार्याची प्रबळ इच्छाशक्ती व संकटकाळी गोंधळात सापडलेल्या लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून प्रभागातील रहिवाशांसाठी ...

Health cards made by the corporator for the citizens of the ward | नगरसेवकाने प्रभागातील नागरिकांचे बनविले आरोग्य कार्ड

नगरसेवकाने प्रभागातील नागरिकांचे बनविले आरोग्य कार्ड

शेवगाव : सामाजिक जबाबदारीचे भान, विधायक कार्याची प्रबळ इच्छाशक्ती व संकटकाळी गोंधळात सापडलेल्या लोकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करून प्रभागातील रहिवाशांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कार्ड तयार करून त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचे काम शेवगाव येथील नगरसेवक सागर फडके यांनी केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वच स्तरांतून स्वागत होत आहे.

प्रभागातील कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढली. वाढत्या रुग्णसंख्येला आळा घालण्यासाठी दैनंदिन उपाययोजनांबरोबर लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. प्रभागातील सर्व नागरिकांचे लवकरात लवकर वेळेवर लसीकरण व्हावे. या उद्देशाने नगरसेवक सागर फडके यांनी नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेत 'माझा प्रभाग, माझी जबाबदारी' ही संकल्पना राबविली. प्रभाग कोरोनामुक्त करण्यासाठी आखलेली ‘आरोग्य कार्ड’ ही योजना कमालीची यशस्वी ठरली.

प्रभाग क्रमांक १६ मधील ३५० कुटुंबातील जवळपास २ हजार ४०० नागरिकांची आरोग्य व लसीकरण विषयीची माहिती आरोग्य कार्डच्या माध्यमातून संकलित करण्यात आली आहे. त्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे, वय, इतर आजार, रक्तगट, कोरोना चाचणी केल्याची तसेच पहिला लसीकरणाचा डोस घेतल्याची दिनांक, दुसरा डोस कधी घ्यायचा आहे त्याची आगामी तारीख, या कार्डात नमूद करण्यात येऊन ती माहिती नगरसेवक सागर फडके यांनी स्वतःच्या कार्यालयात संकलित केली आहे. संकलित माहितीनुसार दररोज, लसीकरण सत्राच्या दिवशी ज्यांना पहिला व दुसरा लसीचा डोस घ्यायचा आहे, अशा लोकांना आठवण करून दिली जाते आहे. त्यांना मोबाइलवर संपर्क साधून तसेच संदेश पाठवून लसीकरण सत्राची माहिती दिली जाते.

---

नागरिकांसाठी इतरही सुविधा..

गरजू रुग्णांचा एचआरसीटी चाचणी, रक्त लघवी तपासणी, कोरोना चाचणी आदींसाठी लागणारा ५० टक्के खर्च फडके यांनी उचलला. शहरातील कोविड सेंटरला दर रविवारी वेगवेगळ्या स्वरूपाची मदत. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांना सवलतीच्या दरात लिनफ्लूजा लसीचे नियोजन. अर्सेनिक अल्बम, गरजू लोकांना मास्क, गरजवंतांसाठी किराणा, औषध वाटप, कोरोना चाचणी शिबिर, मास्कचे वाटप केले.

---

१८ सागर फडके

160621\14541720img-20210613-wa0028.jpg

प्रभागातील नागरिकाकडून आरोग्य कार्ड वर कुटुंबातील सदस्यांची माहिती संकलित करतांना नगरसेवक सागर फडके.

Web Title: Health cards made by the corporator for the citizens of the ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.