अरोळे हॉस्पिटलच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:21 IST2021-04-02T04:21:31+5:302021-04-02T04:21:31+5:30
जामखेड : डॉ. अरोळे हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाने त्यांच्या अडचणी दूर करायला हव्यात. ...

अरोळे हॉस्पिटलच्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडणार
जामखेड : डॉ. अरोळे हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यामुळे सरकार, प्रशासनाने त्यांच्या अडचणी दूर करायला हव्यात. येथे ऑक्सिजन, जनरेटरसाठीच्या डिझेलची कमतरता असल्याचे हॉस्पिटल प्रशासनाकडून समजले. या व इतर अडचणी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांसमाेर मांडणार आहे. येथे अधिकाधिक सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी यावेळी दिली.
तालुक्यातील कोरोनाचे वाढते रुग्ण, डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटलच्या असणाऱ्या समस्या, बाधित रुग्णांची विचारपूस केल्यानंतर शिंदे यांनी डॉ. अरोळे हॉस्पिटलचे संचालक डॉ. शोभा अरोळे व रवी अरोळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी रवी अरोळे यांनी हॉस्पिटलमधे सध्या २३९ रुग्ण उपचार घेत आहेत. उन्हाळा असल्याने उष्णता वाढली आहे. यामुळे वीज गेल्यावर जनरेटर तासन्तास चालू ठेवावे लागते. त्यासाठी लागणाऱ्या डिझेलसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च होत आहे. तसेच २३९ बाधित रुग्णांपैकी ५५ रुग्णाला दररोज ४९ ऑक्सिजन सिलिंडर लागत आहेत. यासाठीही खर्च होतो, असे त्यांनी शिंदे यांना सांगितले.
त्यानंतर शिंदे म्हणाले, डॉ. अरोळे कोविड हॉस्पिटल कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करत आहे. त्यासाठी त्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे. येथील अडचणींसाठी लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, विधि जिल्हा अध्यक्ष प्रवीण सानप, शहराध्यक्ष बिभीषण धनवडे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शरद कार्ले, जि. प. सदस्य सोमनाथ पाचरणे, प्रवीण चोरडिया, मनोज कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक अमित चिंतामणी, प्रसिद्धीप्रमुख उद्धव हुलगुंडे, डॉ. अलताब शेख, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, गोरख घनवट, राजेंद्र म्हेत्रे, ईश्वर हुलगुंडे, आप्पासाहेब ढगे, मोहन गडदे आदी उपस्थित होते.
--
०१ जामखेड शिंदे
जामखेड येथील अरोळे कोविड सेंटरला माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली.