रेल्वेच्या धडकेत डोक्याचा झाला चेंदामेंदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:24 IST2021-09-24T04:24:41+5:302021-09-24T04:24:41+5:30

अहमदनगर : विळद (ता. नगर) येथील रेल्वेस्टेशन येथे मंगळवारी (दि. २१) भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ...

He was hit in the head by a train | रेल्वेच्या धडकेत डोक्याचा झाला चेंदामेंदा

रेल्वेच्या धडकेत डोक्याचा झाला चेंदामेंदा

अहमदनगर : विळद (ता. नगर) येथील रेल्वेस्टेशन येथे मंगळवारी (दि. २१) भरधाव रेल्वेची धडक बसून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मयताच्या डोक्याची कवटी फुटून चेंदामेंदा झाल्याने चेहरेपट्टीची ओळख पटू शकली नाही.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती भरधाव रेल्वेखाली सापडली. यात रेल्वेची जोरदार ठोकर लागून मयताच्या डोक्याची कवटी फुटून चेंदामेंदा झाला. मोठ्या प्रमाणात रक्त वाहिले. यात संबंधित व्यक्ती जागीच मयत झाली. या मयताची उंची ५ फूट ३ इंच असून, वय अंदाजे ५५ वर्षे असावे. मयत रंगाने गोरा असून, पांढरी बारीक दाढी व मिशा आहेत. अंगात बदामी रंगाचा उभ्या रेषा असलेला शर्ट आहे. पुढील तपास पोलीस नाईक एस.ए. वाकसे हे करीत आहेत. मात्र, मयताची ओळख पटत नसल्याने तपासात अडखळे येत आहेत. त्यामुळे वरील वर्णनाची व्यक्ती कोणाच्या ओळखीतील, माहितीतील असल्यास अहमदनगर लोहमार्ग पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक देवसिंग बाविस्कर यांनी केले आहे.

Web Title: He was hit in the head by a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.