‘तो’ मृतदेह पुणे जिल्ह्यातील, पोलिसांना मिळाले धागेदोरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 14:51 IST2021-02-10T14:50:37+5:302021-02-10T14:51:37+5:30

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारात दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील आहे.  श्रीगोंदा पोलिसांना अवघ्या चार दिवसात तपासात  तसे धागेदोरे मिळाले आहेत. 

‘He’ bodies from Pune district, | ‘तो’ मृतदेह पुणे जिल्ह्यातील, पोलिसांना मिळाले धागेदोरे

‘तो’ मृतदेह पुणे जिल्ह्यातील, पोलिसांना मिळाले धागेदोरे

श्रीगोंदा :  तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारात दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील आहे.  श्रीगोंदा पोलिसांना अवघ्या चार दिवसात तपासात  तसे धागेदोरे मिळाले आहेत. 

 सोमवारी दुपारी टाकळी शिवारात ४५ वर्षीय  शिर नसलेला  पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता.  त्यावर पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. 

 मृतदेहाच्या अंगातील कपडे व कोणत्या टेलरने हा शर्ट शिवला आहे.  टेलरचा सिम्बाॅलबाबत पुणे-बीड-सोलापुर जिल्हय़ातील पोलीस स्टेशनला ऑनलाईन माहिती कळविली आहे. टेलरचा सिम्बाल व शर्ट, त्याचा रंग नातेवाईकांनी ओळखला आहे. ते श्रीगोंदा पोलिस स्टेशन मध्ये दाखल झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.  सदर व्यक्तीचा संपत्तीच्या वादातून किंवा सावकारीतून झाला असावा, असा पोलिसांना संशय आहे.

 

 

Web Title: ‘He’ bodies from Pune district,