संगमनेरात एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 16:25 IST2019-11-23T16:25:03+5:302019-11-23T16:25:30+5:30

एचडीबी फायनान्स कंपनीच्या संगमनेरातील कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील एक लाख ४ हजार ३६ रूपयांची रोकड चोरून नेली.

HDB Finance Company's office smashed in Sangamnar | संगमनेरात एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले

संगमनेरात एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले

संगमनेर : एचडीबी फायनान्स कंपनीच्या संगमनेरातील कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी तिजोरीतील एक लाख ४ हजार ३६ रूपयांची रोकड चोरून नेली. ही घटना गुरूवारी संध्याकाळी सात ते शुक्रवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संगमनेरातील नाशिक-पुणे महामार्गावर सह्याद्री महाविद्यालयासमोर विश्वसुमन पॅरडाईज कॉम्प्लेक्समध्ये एचडीबी फायनान्स कंपनीचे कार्यालय आहे. या कार्यालयाचे शटर उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. तिजोरीतील १ लाख चार हजार ३६ रूपयांची रोकड चोरून नेली. एचडीबी फायनान्स कंपनीच्या संगमनेर शाखेचे शाखाधिकारी संदीप माधवराव गाढवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यातील ठाणे अंमलदार, सहाय्यक फौजदार शिवाजीराव फटांगरे यांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय कवडे तपास करीत आहेत.

Web Title: HDB Finance Company's office smashed in Sangamnar