केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी अण्णांचे जंतरमंतरवर आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2017 13:19 IST2017-05-09T13:19:43+5:302017-05-09T13:19:43+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे पुरावे आल्यास आपण स्वत: केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन व उपोषण करू

केजरीवालांच्या राजीनाम्यासाठी अण्णांचे जंतरमंतरवर आंदोलन
आ नलाइन लोकमत पारनेर (अहमदनगर), दि. ९ -दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन कोटी रुपये घेतल्याचे पुरावे आल्यास आपण स्वत: केजरीवाल यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर धरणे आंदोलन व उपोषण करू, असे जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले. अण्णांच्या या आंदोलनाच्या पावित्र्यामुळे केजरीवालांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंत्री सत्येंद्र जैन यांच्याकडून दोन कोटी रुपये घेतल्याचा आरोप बडतर्फ मंत्री कपिल मिश्रा यांनी केला होता. या घडामोडीनंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांच्याकडून अपेक्षा भंग झाल्याचे सांगितले. केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. केजरीवाल यांच्यावरील आरोपांचे पुरावे आपणास मिळाले व त्यात गैरप्रकार आढळून आल्यास आपण त्यांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीतील जंतरमंतरवर आंदोलन करु,असे अण्णांनी स्पष्ट केले आहे.