हजारे यांच्याकडून आदर्श शिक्षक पोटे यांचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:21 IST2021-09-13T04:21:06+5:302021-09-13T04:21:06+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक व राळेगणसिद्धीचे सुपुत्र राजेंद्र पोटे यांना जिल्हा ...

हजारे यांच्याकडून आदर्श शिक्षक पोटे यांचा सन्मान
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक व राळेगणसिद्धीचे सुपुत्र राजेंद्र पोटे यांना जिल्हा परिषदेचा यावर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते नुकताच त्यांचा सन्मान करण्यात आला.
राजेंद्र पोटे यांनी अरणगाव दुमाला प्राथमिक शाळेत शैक्षणिक उठावाच्या माध्यमातून भरीव कामगिरी केली असून, वार्षिक स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, संगणक शिक्षण, विविध स्पर्धा, जलपुनर्भरण योजना, परसबाग, सीडबँक, वृक्षारोपण, विद्यार्थी दत्तक योजना, बचत योजना, विद्यार्थी ग्राहक भांडार या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली. त्यांनी तयार केलेल्या सर्व शाळांना अनुकरणीय ‘झेडपीच्या शाळेत जाऊया’ शैक्षणिक गीताला सर्व शिक्षक पालक यांनी विशेष पसंती दिली.
120921\img_20210911_201205.jpg
जिल्हा परीषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक राजेंद्र पोटे यांचा सन्मान करताना पद्मभूषण डॉ अण्णासाहेब हजारे . ( छाया - संदीप घावटे)