गावठी कट्टा विकणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 14:08 IST2018-06-26T14:07:21+5:302018-06-26T14:08:11+5:30

गेवराई (जि. बीड) येथून नगर शहरात गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

Hawk solder | गावठी कट्टा विकणारा अटकेत

गावठी कट्टा विकणारा अटकेत

अहमदनगर : गेवराई (जि. बीड) येथून नगर शहरात गावठी कट्टा विक्री करण्यास आलेल्या तरूणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. नितीन दत्तात्रय जाधव (वय ३०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून २५ हजार २०० रूपयांचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. सोमवारी शहरातील तारकपूर येथे ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजकुमार हिंगोले, कॉन्स्टेबल मन्सूर सय्यद, रवींद्र कर्डिले, दत्तात्रय गव्हाणे, मनोज गोसावी, सचिन अडबल, विजय ठोंबरे, संतोष लोढे, राहुल साळुंके, संभाजी कोतकर यांच्या पथकाने ही कारवाई केली,

Web Title: Hawk solder