हसन मुश्रीफ यांच्या बातमीमधील चौकट

By | Updated: December 5, 2020 04:36 IST2020-12-05T04:36:19+5:302020-12-05T04:36:19+5:30

धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी ...

Hassan Mushrif's news box | हसन मुश्रीफ यांच्या बातमीमधील चौकट

हसन मुश्रीफ यांच्या बातमीमधील चौकट

धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपचे अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सावध भूमिका घेतली. राष्ट्रवादीची मते फुटली. त्यामुळे अमरीश पटेल निवडून आले का? असे मुश्रीफ यांना विचारले असता, ‘मला माहिती नाही,’ असे ते म्हणाले. अमरीश पटेल हे काँग्रेसमधूनच भाजपत गेले आहेत. त्यांनी पक्ष बदलला आहे. आता तेथे कोणाचे किती मतदार आहेत, याची मी काही माहिती घेतली नाही. एकनाथ खडसे यांना पक्षात घेतल्याचा राष्ट्रवादीला या निवडणुकीत फायदा झाला नाही का? असे विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, एकनाथ खडसे यांचा येथे काही संबंध येत नाही, असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले.

Web Title: Hassan Mushrif's news box

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.