माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:15 IST2021-07-02T04:15:20+5:302021-07-02T04:15:20+5:30

प्राजक्ता किरण कोळगे (वय २२, रा. चिंचविहिरे, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जून ...

Harassment of a married woman to bring two lakh rupees from Maher | माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

माहेरुन दोन लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

प्राजक्ता किरण कोळगे (वय २२, रा. चिंचविहिरे, ता. राहुरी) या विवाहित तरुणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. जून २०१९ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान यातील आरोपी यांनी फिर्यादी प्राजक्ता किरण कोळगे या तरुणीचे लग्न झाल्यापासून ते ३० ऑक्टोबर २०१९ दरम्यान फिर्यादी प्राजक्ता कोळगे हिने चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये घेऊन येत नाही. या कारणावरून यातील आरोपींनी प्राजक्ता हिला वारंवार शिवीगाळ दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ करून तिला उपाशीपोटी ठेवले. तिला घराचे बाहेर हाकलून दिले.

फिर्यादीवरून आरोपी किरण नानासाहेब कोळगे, नानासाहेब दामू कोळगे, आशाबाई नानासाहेब कोळगे, विशाल बबन कोळगे, बबन दामू कोळगे (रा. नांदुर्खी, ता. राहता) या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक विठ्ठल राठोड हे करीत आहेत.

Web Title: Harassment of a married woman to bring two lakh rupees from Maher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.