शेवगावच्या महिला वरिष्ठ अधिकाऱ्याचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:16 IST2021-07-21T04:16:06+5:302021-07-21T04:16:06+5:30
शेवगाव : तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असे म्हणत शेवगाव येथील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी ...

शेवगावच्या महिला वरिष्ठ अधिकाऱ्याचा विनयभंग
शेवगाव : तुम्ही छान ड्रेस घालता, खूप छान दिसता, असे म्हणत शेवगाव येथील एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी एका तरुणावर मंगळवारी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी दिली.
संबंधित महिला अधिकाऱ्याने शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून विशाल विजयकुमार बलदवा (रा. मारवाडगल्ली, शेवगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिला अधिकाऱ्याने दिलेल्या अर्जाच्या अनुषंगाने सहायक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे यांनी प्राथमिक चौकशी करून मंगळवारी रात्री गुन्हा दाखल केला. या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, विशाल हा फोन करून, कार्यालयात चकरा मारून ओळख वाढविण्याचा प्रयत्न करीत होता, तसेच अवैध व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी मदत करून व त्यातून येणारे पैसे पोहोच करून लाचेचे आमिष दाखवायचा, तसेच माझ्याजवळ मन हलके करीत जा, तुम्ही छान ड्रेस घालता. त्यामुळे तुम्ही छान व फ्रेश दिसता, असे म्हणत त्याने संबंधित महिला अधिकाऱ्याचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.
..............
कौटुंबिक बदनामीही केली
अमर उपोषणाच्या नावाखाली संबंधित महिला अधिकाऱ्याचे विचित्र पोस्टर छापून सामाजिक व कौटुंबिक बदनामी करू लागला, तसेच महिला अधिकाऱ्यांचे पती व मुलीबद्दल फोनवर अश्लील व अर्वाच्च भाषेत संभाषण केले. संबंधित महिला अधिकाऱ्याच्या पतीलाही मेसेज पाठवून त्रास दिला, असे फिर्यादीत म्हटले आहे.