१३०० ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:21 IST2021-03-10T04:21:23+5:302021-03-10T04:21:23+5:30

अहमदनगर : जिल्ह्यातील १३११ ग्रामपंचायतींमध्ये मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून रोजगार हमी योजना प्रत्येक ...

Handicrafts in 1300 Gram Panchayats | १३०० ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम

१३०० ग्रामपंचायतींमध्ये हाताला काम

अहमदनगर : जिल्ह्यातील १३११ ग्रामपंचायतींमध्ये मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. कोणत्या ना कोणत्या योजनेच्या माध्यमातून रोजगार हमी योजना प्रत्येक गावात पोहोचली आहे. सध्याही जिल्ह्यात वेगवेगळ्या कामांच्या माध्यमातून ११ हजार २२३ मजूर कामावर आहेत. सर्वाधिक ग्रामपंचायतींची संख्या असलेली संगमनेर, अकोले ही तालुके आघाडीवर आहेत.

जिल्ह्यातील २०२०-२१ मध्ये रोजगार हमीच्या कामांचा आढावा घेतला असता जिल्ह्यातील १३२० पैकी १३११ ग्रामपंचायतींमध्ये मजुरांना काम मिळाले आहे. त्यामुळे रोजगार हमीवर मजुरांचीही चांगली उपस्थिती आहे. जिल्ह्यातील संगमनेर, अकोले, अहमदनगर, पाथर्डी, श्रीगोंदा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत. या सर्वच ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून स्थानिक मजुरांना काम मिळाले आहे. स्थानिक ठिकाणी कामे देण्यात रोजगार हमी जिल्ह्यात यशस्वी ठरली आहे.

------------------

एकूण जॉबकार्डधारक- ६, ४९,०००

सक्रिय जॉबकार्ड- १,४१,०००

मजूर संख्या- २,५६,०००

कामांची संख्या- २४४७

------------

तालुका कामे सुरू असलेल्या ग्रा.पं.

अकोले- १४६

जामखेड- ५८

कर्जत- ९१

कोपरगाव- ७५

नगर- १०५

नेवासा- ११४

पारनेर- ११२

पाथर्डी- १०८

राहाता- ५०

राहुरी- ८२

संगमनेर- १४१

शेवगाव-९३

श्रीगोंदा- ८४

श्रीरामपूर- ५२

एकूण- १३११

-------------

जिल्ह्यात जवळपास सर्वच ग्रामपंचायतीमध्ये रोजगारांच्या हाताला काम देण्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना यशस्वी ठरली आहे. पूर्वीची ग्रामपंचायत असलेली व नंतर नगर पंचायतीत रूपांतर झालेली गावे वगळण्यात आली आहेत. अन्यथा शंभर टक्के ग्रामपंचायती या रोजगार हमीमधून रोजगार देण्यात यशस्वी झाल्या आहेत.

-उदय किसवे, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी

--------

डमी - नेट फोटो

०८ रोजगार हमी योजना डमी

रोजगार (फोटो)

Web Title: Handicrafts in 1300 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.