तीनच तालुक्यांत निम्मे सक्रिय रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:26 IST2021-09-12T04:26:22+5:302021-09-12T04:26:22+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात रोज सातशे ते आठशे कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत, तर तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी ...

Half active patients in only three talukas | तीनच तालुक्यांत निम्मे सक्रिय रुग्ण

तीनच तालुक्यांत निम्मे सक्रिय रुग्ण

अहमदनगर : जिल्ह्यात रोज सातशे ते आठशे कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळून येत आहेत, तर तेवढेच रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे जिल्ह्यात पाच हजार इतकी सक्रिय रुग्णांची संख्या स्थिर दिसून येत आहे. एकट्या संगमनेर तालुक्यात एक हजार १५१ एवढे सक्रिय रुग्ण असून, अकोले व पारनेर तालुक्यांत प्रत्येकी सहाशे रुग्ण सक्रिय आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी निम्मे सक्रिय रुग्ण या तीन तालुक्यांतच आहेत.

जिल्ह्यात शनिवारी ७७६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ८११ रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. सध्या जिल्ह्यात ५ हजार ६०५ इतके रुग्ण सक्रिय असून, विविध ठिकाणी उपचार घेत आहेत. शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या प्रयोगशाळेत १५५, खासगी प्रयोगशाळेत ३६१, तर अँटिजन चाचणीत २७२ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामध्ये अहमदनगर शहर (३४), राहाता (४९), संगमनेर (११८), श्रीरामपूर (२०), नेवासे (५९), नगर तालुका (२७), पाथर्डी (२६), अकोले (१३७), कोपरगाव (१८), कर्जत (३४), पारनेर (७८), राहुरी (२१), भिंगार (६९), इतर जिल्हा (२३) येथील रुग्णांचा समावेश आहे.

--------------

...असे आहेत सक्रिय रुग्ण

नगर शहर-२३९

अकोले-६२३

जामखेड-१०७

कर्जत-३०८

कोपरगाव-१५२

नगर ग्रामीण-२०९

नेवासा-३२३

पारनेर-६५६

पाथर्डी-३५३

राहाता-२४६

राहुरी-२५५

संगमनेर-११५१

शेवगाव-२७७

श्रीगोंदा-४६८

श्रीरामपूर-१४४

भिंगार-११

इतर जिल्हे-७९

एकूण-५६०५

------------

कोरोना स्थिती

एकूण रुग्ण-३,३२,२९८

बरे झालेले-३,२०,०५६

सक्रिय रुग्ण-५६०५

मृत्यू-६६३७

-----------------------

पॉझिटिव्हिटी रेटही स्थिरच

जिल्ह्यात दररोज १५ हजार जणांची कोरोना चाचणी होत आहे. त्यापैकी सातशे ते आठशे बाधित होत आहेत. म्हणजे जिल्ह्यातील कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५ टक्के इतका आहे. हाच दर गत दोन महिन्यांपासून स्थिर आहे. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

Web Title: Half active patients in only three talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.