जिल्ह्यात गारांचा पाऊस : पाथर्डी, नगर तालुक्यात गारांचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 17:29 IST2021-03-20T17:28:57+5:302021-03-20T17:29:24+5:30

पाथर्डी, नगर तालुक्यात विविध ठिकाणी आज दुपारी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

Hailstorm in the district: Hailstorm in Pathardi, Nagar taluka | जिल्ह्यात गारांचा पाऊस : पाथर्डी, नगर तालुक्यात गारांचा सडा

जिल्ह्यात गारांचा पाऊस : पाथर्डी, नगर तालुक्यात गारांचा सडा

अहमदनगर : पाथर्डी, नगर तालुक्यात विविध ठिकाणी आज दुपारी गारांचा पाऊस पडला. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. 

आज दुपारी साडेचार वाजेदरम्यान  पाथर्डी तालुक्यातील डांगेवाडी शिवारात जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. डांगेवाडी येथून तीन किलोमीटर परिसरात जोरदार गारपीट होऊन सर्वत्र पाणीच पाणी झाले. सुमारे पंधरा मिनिटे गारपीट चालू होती. गारपिटीमुळे डांगेवाडी येथील उसाचे व कांद्याचे मोठे नुकसान झाले. अचानक झालेल्या गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल झाले. नुकसानीची भरपाई मिळावी अशी शेतकऱ्याकडून मागणी होत आहे. पाथर्डी शहरात सुद्धा जोरदार वारे वाहत होते. साकेगाव परिसरात गारांचा पाऊस झाला. 

पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव, साकेगाव , चितळी, सांगवी, खेर्डै परिसरात दुपारी चारच्या सुमारास  वादळी वाऱ्यासह गाराचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.  वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे कांदा, संत्रा, गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे

नगर तालुक्यात गाराच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. निंबोडी, सारोळा बद्दी परिसरात गारांसह पाऊण तास जोरदार पाऊस झाला. 

Web Title: Hailstorm in the district: Hailstorm in Pathardi, Nagar taluka