सिध्दार्थनगरात गॅस्ट्रो

By Admin | Updated: June 25, 2014 00:31 IST2014-06-24T23:38:37+5:302014-06-25T00:31:52+5:30

अहमदनगर : दूषित पाणी पुरवठ्यामुळे सिध्दार्थनगरमध्ये गॅस्ट्रोची लागन झाली आहे.

Gusto in siddharthnagar | सिध्दार्थनगरात गॅस्ट्रो

सिध्दार्थनगरात गॅस्ट्रो

अहमदनगर : दूषित पाणी पुरवठ्यामुळे सिध्दार्थनगरमध्ये गॅस्ट्रोची लागन झाली आहे. रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आरोग्य विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांनी केली आहे.
गत आठवड्यापासून सिध्दार्थनगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन लिकेज झाल्याने ड्रेनेजचे पाणी त्यात मिसळून दूषित पाणी नळाला येत आहे. या पाण्यामुळे परिसरातील नागरिकांना जुलाब, उलटी होण्यास सुरूवात झाली. सिध्दार्थनगरमधील जवळपास पन्नास रुग्णांना गॅस्ट्रोचा त्रास होत असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस्ट्रोची साथ पसरली असतानाही महापालिकेचा कोणताही अधिकारी या परिसरात फिरकला नाही. पाणी पुरवठा विभागाने तातडीने लिकेज काढून स्वच्छ पाणी पुरवठा करावा, तसेच आरोग्य विभागाने या भागात तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी शेकटकर यांनी केली आहे. तसे निवेदन वंदना गणपत शेकटकर, मंगला आपटे, कमलबाई दिवटे, महेश आदमने, संतोष ठोकळ, संदीप पठारे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे. (प्रतिनिधी)
सिद्धार्थनगर भागात गॅस्ट्रोची लागण झाली आहे. या संदर्भात कुठलेही निवेदन अथवा पत्र आरोग्य विभागाला प्राप्त झालेले नाही. बालिकाश्रम रस्त्यावरील भागात अशी तक्रार आली होती. तेथे फिरता दवाखाना सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सिद्धार्थनगर भागात आरोग्याच्या तक्रारी असतील तर तेथील नागरिकांची तपासणी केली जाईल. तक्रार प्राप्त होताच, तेथे आरोग्य पथक पाठविण्यात येईल.
- डॉ. सतीश राजूरकर, आरोग्यधिकारी
बालिकाश्रम रोड परिसरात आजार
बालिकाश्रम रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या भागातील जलवाहिन्या अनेक ठिकाणी फुटलेल्या आहेत. ड्रेनेज लाईनचेही कामे सुरू आहेत. त्यामुळे घाण पाणी जलवाहिन्यांमध्ये शिरले आहे. परिणामी या भागातही जुलाबाची साथ पसरली आहे. अनेक नागरिक आजार फैलावले आहेत.

Web Title: Gusto in siddharthnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.