शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

अयोध्येतील श्रीराम मंदिर विश्वाला संस्कार देणारे ठरेल; गुरुवर्य भास्करगिरी महाराज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 11:53 IST

अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी काढले.

नेवासा :  अयोध्या येथील नियोजित श्रीराम मंदिर निर्माण कार्याच्या पार्श्वभूमीवर श्रीराम जन्मभूमी विकास निधी संकलन अभियानाचा शुभारंभ गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते गुरुवारी नेवासा येथे  करण्यात आला. अयोध्येतील बांधण्यात येणारे प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर हे विश्वाला संस्कार देणारे व माणसाने माणसाशी माणसासारखे कसे वागावे याची शिकवण देणारे ठरेल, असे गौरवोदगार श्रीराम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यातील सदस्य श्रीक्षेत्र देवगडचे महंत गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी यावेळी काढले.

     नेवासा नगरीचे ग्रामदैवत असलेल्या श्री मोहिनीराज मंदिर प्रांगणात सोमवारी आयोजित कार्यक्रमाप्रसंगी संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प. शिवाजी महाराज देशमुख,ह.भ.प.उद्धव महाराज मंडलिक,माजी आमदार संभाजीराव फाटके उपस्थित होते.

    प्रारंभी प्रभू श्री रामचंद्र, भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून संकलन निधी पुस्तकाचे पूजन गुरुवर्य भास्करगिरी महाराजांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दर्शन गणेश परदेशी व पाच वर्षीय सुयोग योगेश काळे या बालकांनी साठवलेले खाऊचे पैसे निधीच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी बाबांकडे सुपूर्त करण्यात आले. तर माजी आमदार संभाजीराव फाटके यांच्या सर्व परिवाराच्या वतीने २ लाख ५५ हजारांचा निधी यावेळी धनादेशाच्या रूपाने गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांच्याकडे देण्यात आला.

    यावेळी भास्करगिरी महाराज म्हणाले, निधी संकलनाच्या निमित्ताने रामकार्य होण्यासाठी सर्वजण एकत्रित आलेले दिसत आहेत. सर्व जातीधर्माच्या बांधवांचा यात समावेश आहे. त्यामुळे सर्वांचेच हे कार्य आहे. निधी संकलन करत असतांना पक्ष, जात, भेद, धर्म याचा विचार करु नका. स्वयंसेवक रामभक्त हा गल्लीबोळात दारादारात येणार आहे. त्यांना या कार्यासाठी प्रत्येकी दहा रुपये देऊन या कार्यात सर्वांना खारीचा वाटा उचलण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासाRam Mandirराम मंदिरfundsनिधी